only 14 percent loan distributed in the four districts of Marathwada
only 14 percent loan distributed in the four districts of Marathwada  
मुख्य बातम्या

मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४ टक्‍केच कर्जपुरवठा

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्‍यक कर्जपुरवठा करण्यात पुन्हा एकदा बॅंकांनी अनास्थाच दाखविल्याचे चित्र आहे. जानेवारीच्या मध्यापर्यंत औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत रब्बी हंगामासाठी बॅंकांनी १४ टक्‍केच कर्जपुरवठा केल्याची स्थिती आहे. 

रब्बी हंगाम २०२०-२१ साठी औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांना १५६९ कोटी १ लाख २४ हजार रुपये कर्जपुरवठ्याचा लक्ष्यांक देण्यात आला होता. त्या तुलनेत जानेवारी मध्यान्हापर्यंत चारही जिल्ह्यांत केवळ १४.०५ टक्‍के अर्थात २२० कोटी ४२ लाख रुपयांचा तोही २४ हजार ४२६ शेतकरी सभासदांनाच कर्जपुरवठा करण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यात यंदा रब्बीसाठी ५२७ कोटी ९९ लाख रुपयांच्या कर्जपुरवठ्याचा लक्ष्यांक असताना केवळ ५९५८ सभासदांना ५२ कोटी ७४ लाख ७० हजार रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला. जो लक्ष्यांकाच्या केवळ ९.९९ टक्‍के इतका आहे. 

जालना जिल्ह्यात कर्जपुवठ्याचा ४५३ कोटी ७ लाख रुपयांचा लक्ष्यांक आहे. मात्र ९७४३ सभासदांना १०३ कोटी ७६ लाख ६८ हजार रुपये कर्ज पुरविण्यात आले. ते केवळ २२.९० टक्‍के आहे. परभणी जिल्ह्यात ३१३ कोटी ४६ लाख ८६ हजार रुपये लक्ष्यांकाच्या तुलनेत ७७३४ शेतकऱ्यांना ५४ कोटी ६८ लाख १६ हजार रुपये कर्जपुरवठा केला गेला. तो लक्ष्यांकाच्या तुलनेत १७.४४ टक्‍के आहे.

हिंगोली जिल्ह्यात यंदा २७४ कोटी ४८ लाख ३८ हजार रुपये कर्जपुरवठ्याचा लक्ष्यांक आहे. मात्र केवळ ९९१ शेतकऱ्यांना ९ कोटी २२ लाख ७४ हजार रुपयांचा अर्थात लक्ष्यांकाच्या केवळ ३.३६ टक्‍केच कर्जपुरवठा करण्यात आला. 

जिल्हा बँक सर्वांत मागे

चारही जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने लक्ष्यांकाच्या तुलनेत सर्वांत कमी २.२१ टक्‍के, व्यापारी बॅंकांनी १६.५३ टक्‍के, तर ग्रामीण बॅंकेने लक्ष्यांकाच्या २०.९६ टक्‍के कर्जपुरवठा केला. जिल्हा मध्यवर्ती, व्यापारी व ग्रामीण बॅंकेकडून अलीकडच्या काही वर्षात शेतकऱ्यांना लक्ष्यांकानुसार कर्जपुरवठा करण्यात कायम अनास्था दाखविली जात आहे. अर्थात शासनाकडून कर्जमाफी, कर्जमुक्‍ती आदी घोषणांच्या होणाऱ्या रटाळ अंमलबजावणीनेही कर्जपुरवठ्यात मोठ्या प्रमाणात खोडा घालण्याचे काम केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT