नगर जिल्ह्यात कांदादरात चढ-उतार सुरूचOnion prices continue to fluctuate in Nagar district 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात कांदादरात चढ-उतार सुरूच

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत ५४ हजार कांद्या गोण्याची आवक झाली आणि प्रती क्विंटल पाचशे ते ३ हजार रुपये आणि सरासरी २ हजार रुपयाचा दर मिळत आहे.

टीम अॅग्रोवन

नगर : नगरसह जिल्हाभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे. शनिवारी (ता. २) नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत ५४ हजार कांद्या गोण्याची आवक झाली आणि प्रती क्विंटल पाचशे ते ३ हजार रुपये आणि सरासरी २ हजार रुपयाचा दर मिळत आहे. घोडेगाव, पारनेर, राहुरीतही असेच दर आहेत. 

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात जिल्ह्यामधील सर्वाधिक कांद्याची आवक होत असते. नगर जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा महिन्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असला आणि दर पुरेसा नसल्याने कांदा उत्पादक अडचणीत असले तरीही यंदा खरिपात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे.

खरिपातील कांदा काढणी झाला असल्याने  बाजारात आवकत वाढत आहे. सध्या नगरला ५० ते ६० हजार गोण्याची आवक होत असून, इतर बाजार समितीत मिळून एक लाख गोण्यापर्यंत आवक होत आहे. कांद्याची सातत्याने आवक कमी जास्त होत असली तरी दरातही सातत्याने चढ-उतार होत आहे. घोडेगाव, नेवासा, पारनेर, राहुरी, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर बाजार समितीतही असेच दर  आहेत.  

मिळालेला दर असा (क्विंटल)     एक नंबर    २५०० ते ३००० दोन नंबर    १८०० ते २५०० तीन नंबर    १००० ते १८०० चार नंबर    ५०० ते १०००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Karjmafi : कर्जमाफी केली नाही तर शेतकऱ्यांचां उद्रेक होईल; डॉ. अजित नवलेंचा सरकारला इशारा

Indian Politics: किसमें कितना है दम!

Cotton Market : कापसाचे उत्पादन घटूनही भाव दबावात का?

Parliament Monsoon Session : ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात कॉँग्रेसचे सरकारला आठ प्रश्न

Urea Shortage : युरिया टंचाईवर ग्रीन अमोनियाची मात्रा?

SCROLL FOR NEXT