साडेदहा हजार क्विंटल तूर, हरभरा खरेदी One and a half thousand quintals Tur, buy a gram
साडेदहा हजार क्विंटल तूर, हरभरा खरेदी One and a half thousand quintals Tur, buy a gram 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात साडेदहा हजार क्विंटल तूर, हरभरा खरेदी

टीम अॅग्रोवन

नगर :  नगर जिल्ह्यात हमीदराने खरेदी सुरू केलेल्या तूर, हरभरा खरेदी केंद्रावर यंदा फारशी खरेदी झालेली नाही. हमीदराच्या तुलनेत बाजारात दर चांगले असल्याने खरेदीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यंदा जिल्हाभरातील सात खरेदी केंद्रावर तुरीची सात हजार पाचशे तर हरभऱ्याची ३ हजार ३१०० क्विंटल खरेदी झाली आहे. सहा केंद्रांवर खरेदीच झाली नसल्याचे सांगण्यात आले.

बाजारात कमी दर मिळत असल्याने हमीदराने तूर, हरभऱ्याची खरेदी करण्यासाठी नगर जिल्ह्यात तेरा ठिकाणी हमी केंद्रे सुरू केली. तेरा केंद्रांपैकी सात केंद्रावरच तूर, हरभऱ्याची खरेदी झाली आहे. त्यात श्रीगोंदा केंद्रांवर ३५ शेतकऱ्यांकडून २३२ क्विंटल हरभरा तर ८३ शेतकऱ्यांकडून ६७१ क्विंटल तूर, कर्जत केंद्रावर ४१ शेतकऱ्यांकडून ४९५ क्विंटल हरभरा तर ४०२ शेतकऱ्यांकडून  ४०१८ क्विंटल तूर, मांडवगण केंद्रावर २५ शेतकऱ्यांकडून १५४ क्विंटल हरभरा तर ५१ शेतकऱ्यांकडून ४८० क्विंटल तूर, नगर केंद्रावर शेतकऱ्यांकडून ४६६ क्विटंल हरभरा, पाथर्डी केंद्रावर ११० शेतकऱ्यांकडून १११३ क्विंटल हरभरा तर १८२ शेतकऱ्यांकडून ८०६ क्विंटल तूर, राहुरी केंद्रावर ५९ शेतकऱ्यांकडून ५९२ क्विटंल हरभरा तर ५ शेतकऱ्यांकडून २८ क्विंटल तूर व साकत (नगर) केंद्रावर १२ शेतकऱ्यांकडून ७२ क्विंटल हरभरा तर ५२ शेतकऱ्यांकडून ४९३ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे.  

हरभरा विक्रीसाठी साडेतीन हजार तर तूर खरेदीसाठी तीन हजार आठशे शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. अकराशे शेतकऱ्यांकडून साडेदहा हजार क्विंटल तूर, हरभऱ्याची खरेदी झाली आहे. जामखेड, खर्डा, तिसगाव, पारनेर, संगमनेर, शेवगाव तालुक्यात खरेदीच झाली नाही, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT