Okra seed growers in trouble due to faulty seeds
Okra seed growers in trouble due to faulty seeds 
मुख्य बातम्या

सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीत

टीम अॅग्रोवन

बुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या हंगामात लावलेले भेंडीचे बियाणे कंपनीकडून निकृष्ट मिळाल्याची तक्रार केली आहे. यामुळे हजारो रूपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. लोणार तालुक्यातील हत्ता येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांपासून कृषी खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले आहे.

याबाबत शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, जालना येथील संबंधित कंपनीने शेतकऱ्यांना बीजोत्पादन प्लॉटसाठी निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरविले. कमीतकमी शेतीत अधिकाधिक उत्पन्न मिळावे या हेतूने शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी निरनिराळ्या कंपनीचे बीजोत्पादन प्लॉट घेऊन जास्तीत जास्त उत्पन्न मिळवितात. यावर्षी हत्ता येथील आशा राजूभाऊ इंगळे व इतर शेतकऱ्यांनी भेंडी या पिकाचे बीजोत्पादन प्लॉट घेतले. मात्र, सदर कंपनीने निकृष्ट बियाणे पुरविल्याने क्रॉसिंग करूनही भेंडीची फुले गळून पडत आहेत. तसेच नर फुलांना पावडरच (पुंकेसर) येत नसल्यामुळे क्रॉसिंगही होत नाही. आत्तापर्यंत प्रत्येकाचा खर्च अंदाजे २० ते २५ हजारांवर गेला आहे. प्रत्येक सीड प्लॉटमधून सर्वसाधारणपणे १५० ते २०० किलो उत्पादन होऊन ८० हजार ते सव्वा लाखापर्यंत उत्पन्न येत असते. मात्र, यावर्षी कंपनीने दिलेले बियाणे चांगले नसल्याने शेतकऱ्यांना काहीही मिळण्याची शक्यता नाही.

संबंधित कंपनीविरुद्ध कृषी विभागाने कडक कारवाई करावी व कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी. अन्यथा शेतकरी आंदोलन करतील, असा इशाराही दिला आहे. दरम्यान तक्रारीची दखल घेत कृषी विभागाने संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन स्थळ पंचनामा करीत अहवाल पाठविला आहे. शेतकऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनाही या प्रकरणात लक्ष घालून न्याय देण्याची मागणी केली. या निवेदनावर आशा राजू इंगळे, गणेश मापारी, जावेद हसन चौधरी, राजू राठोड आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी व्ही. आर. बेतीवार यांच्या आदेशावरून कृषी विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता. १८) पाहणी केली. आता या अहवालावर पुढील दिशा ठरणारा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT