ethanol  
मुख्य बातम्या

तेल कंपन्यांकडून इथेनॉल आयातीची मागणी 

केंद्राने कोणत्याही परिस्थितीत इथेनॉलची आयात करू नये यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. भविष्यात देशातील इथेनॉल निर्मितीवर याचा विपरीत परिणाम होऊ नये यासाठी केंद्राने आयातीला परवानगी देऊ नये, अशी मागणी आम्ही पेट्रोलिअम मंत्रालय व पंतप्रधानांकडे करत आहोत. - प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

Raj Chougule

कोल्हापूर : साखर कारखान्यांकडून पुरेशा प्रमाणात इथेनॉल निर्मिती होत नसल्याने इथेनॉल आयातीचा मार्ग केंद्राकडून स्वीकारला जाण्याची शक्‍यता आहे. अमेरिकेतील इथेनॉल उत्पादक कंपन्यांनी इथेनॉल पुरवठ्याबाबत तयारी दर्शविली आहे. पेट्रोलिअम कंपन्यांना गरजेइतके इथेनॉल कारखान्यांकडून मिळत नसल्याने त्यांनी केंद्राकडे आयातीची परवानगी मागितली आहे. केंद्राने याबाबत सकारात्मकता दाखविली तर याचा मोठा फटका देशातील साखर उद्योगाला बसेल. 

१ डिसेंबर २०१९ ते ३० नोव्हेंबर २०२० या कालावधीकरिता तेलकंपन्यांनी ५११ कोटी लिटर इथेनॉलची मागणी देशातील कारखान्यांकडे नोंदविली आहे. देशातील कारखान्यांनी केवळ १६३ कोटी लिटर इथेनॉल पुरविण्याचा करार या कंपन्यांबरोबर केला आहे. मागणीच्या प्रमाणात जवळ जवळ साडेतीनशे कोटी लिटरहून अधिक इथेनॉलचा तुटवडा तेल कंपन्यांना भासणार आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी पेट्रोलिअम कंपन्यांनी केंद्राकडे इथेनॉल आयातीची परवानगी मागितली आहे. अमेरिकेतील मक्‍यापासून इथेनॉल तयार करणाऱ्या कंपन्यांनी इथेनॉलचा पुरवठा करण्यास सकारात्मकता दाखवली आहे. स्वस्त दरात पुरवठा करण्याबाबत त्या तयार झाल्या आहेत. अशा परिस्थितीत जर आयातीला हिरवा कंदील मिळाल्यास देशातील इथेनॉल निर्मिती प्रक्रियाच धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. 

केंद्राने इंधनात दहा टक्के इथेनॉलचा वापर करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पण सध्य स्थिती पाहता उत्पादनाअभावी पाच टक्केही इथेनॉल वापरले जाऊ शकत नाही अशी स्थिती आहे. उर्वरित इथेनॉल मिळविण्यासाठी कंपन्यांनी बाहेरून इथेनॉल आयात करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

साखरेपासून इथेनॉल निर्मितीला कारखान्यांची नकारघंटा  केंद्राने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन म्हणून नुकतेच सी हेवी, बी हेवी, इथेनॉलबरोबरच साखरेपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचे दरही ठरवून दिले आहेत. साखरेपासून बनणाऱ्या इथेनॉलला प्रति लिटरला ५९.४८ पैसे असा सर्वोच्च दर देऊन कारखान्यांना प्रोत्साहन दिले. केंद्राने आपली भूमिका बजावली असली तरी कारखान्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले. तांत्रिक आणि फायद्या तोट्याच्या गणितात अडकल्याने कारखान्यांना या निर्णयाचा फायदा घेता आला नाही. उत्तर प्रदेश व नजीकच्या राज्यात वेगळी, तर महाराष्ट्रात वेगळ्या अडचणी आल्या. त्याचा एकत्रित परिणाम इथेनॉलची निर्मिती घटण्यावर होत आहे. 

राज्यनिहाय अडचणी वेगळ्या  महाष्ट्रात जी साखर शिल्लक आहे ती माल तारण खात्यावर आहे. त्याच्यावर अगोदरच बॅंकाकडून उचल घेतलेली आहे. त्या पोत्याचे पैसे भरल्याशिवाय तुम्ही त्या साखरेला धक्का लावू शकत नाही. यामुळे कारखान्यांनी साखरेपासून इथेनॉल तयार करण्याचे प्रयत्न सोडून दिले आहेत. तर उत्तर प्रदेश व अन्य भागातील कारखान्यांपुढे वेगळीच अडचण आहे. त्यांच्याकडे माल तारण हा प्रकार नाही. पण इथेनॉल तयार करण्याअगोदर तयार होणाऱ्या रेक्‍टिफाइड स्पिरिट आणि एक्‍स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल या दोन पदार्थांना इथेनॉलपेक्षा चांगला दर मिळत आहे. यामुळे राज्याबाहेरचे कारखाने हे पदार्थ तयार करून विकण्याला प्राधान्य देत आहेत. अर्थात, या दोन्ही पदार्थांना कायम स्वरूपी चांगला दर मिळत नसला तरी सध्या समाधानकारक दर असल्याने कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती केली नाही. 

आयातीच्या सवयीचा धोका शक्‍य  तेल कंपन्यांनी भारतात इथेनॉल पुरेसे तयार होईपर्यंत आयात करण्याची परवानगी मागितली आहे. काही काळ आयात केल्यानंतर भारतात साखर कारखान्यांकडून इथेनॉल तयार झाल्यास पुन्हा दोन्हींची तुलना होईल. कंपन्यांकडून स्वस्त दराने इथेनॉलची मागणी होण्याचा धोका आहे. याचा सगळाच परिणाम एफआरपीसह अन्य घटकांवर होण्याची शक्‍यता आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Rate: केळी दर निश्‍चिती बाबतप्रशासनाची चालढकल

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा ‘जीआर’ मागे घेणार नाही : विखे पाटील

Gokul Dairy Products: ‘गोकुळ’ आइस्क्रीम, बटर बाजारात आणणार

Government Decision: कृषी कर्मचाऱ्यांना लॅपटॉपच देणार

Agricultural Damage: पंजाबमध्ये १.८४ लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT