The number of Akola coronary patients is 105
The number of Akola coronary patients is 105 
मुख्य बातम्या

अकोल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०५ 

टीम अॅग्रोवन

अकोला ः गेल्या पाच दिवसांपासून अकोल्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून शुक्रवारी (ता.आठ) हा आकडा शंभरावर पोचला. आता बाधितांची संख्या १०५ झाली आहे. शुक्रवारी सकाळी ८९ जणांचे अहवाल आले. त्यात १० जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह तर ७९ जणांचे निगेटिव्ह आले आहेत. त्याआधी गुरुवारी (ता. सात) १३ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. 

जिल्ह्यात १०५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यातील अकरा जणांचा मृत्यू झालेला असून १४ जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. ८) पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये सहा महिला असून एक १२ वर्षांची मुलगी सुद्धा आहे. तर चार पुरुष आहेत. आठ रुग्ण बैदपुरा तर एक भगतसिंह चौक आणि एक जुने शहरातील आहे. 

खासगी रुग्णालये अधिग्रहण करणार  जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. ही वाढ सातत्याने महानगरपालिका हद्दीत असली तरी संपूर्ण जिल्ह्यात खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी वाढत्या रुग्णसंख्या पाहता उपचारासाठी आता खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. जिल्हा प्रशासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सर्वोपचार रुग्णालय येथे उपचाराची व्यवस्था केली आहे. अलगीकरण, विलगीकरण कक्षांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात व्यवस्था करण्यात आली आहे. तथापि, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने अकोला शहरातील खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. 

जिल्ह्यात तालुक्याच्या सीमाबंद  कोरोना विषाणू प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात रविवारी (ता. १७) मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू आहे. तथापि वाढता प्रादुर्भाव पाहता संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून जिल्ह्यातील सातही तालुक्यांच्या सीमा बंद करणाचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यांच्या राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, अंतर्गत मार्गांवरील तालुक्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा व परवानगी धारक वाहने वगळता अन्य वाहतूक बंद राहील.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT