मध्य महाराष्ट्र, काेकणात हलक्या पावसाचा अंदाज
मध्य महाराष्ट्र, काेकणात हलक्या पावसाचा अंदाज  
मुख्य बातम्या

मध्य महाराष्ट्र, काेकणात हलक्या पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने शनिवारपासून मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित ठिकाणी कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.    राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहे. मागील आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसानंतर आता पहाटे गारठा तर दुपारी उन्हाचा चटका अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे दिवस-रात्रीच्या तापमानात घट झाली असून, तापमानातील तफावत वाढली आहे. शुक्रवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे दिवसाचे तापमान उच्चांकी ३९ अंश सेल्सिअस पुण्यात रात्रीचे नीचांकी १२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले.  राज्यातील कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात दिवस आणि रात्रीच्या तापमानात जवळपास १६ ते २४ अंशांची तफावत असल्याचे दिसून आले आहे. पहाटेचे तापमान कमी झाल्याने गारठा वाढला अाहे. तर दुपारी उन्हाचा चटका वाढून तापमानात वाढ होत आहे. दोन दिवसांमध्ये विदर्भासह महाराष्ट्राच्या तापमानात वाढ होणार असन्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.   मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९.५ किलोमीटर उंचीवर पश्‍चिम दिशेकडून वेगवान वारे वाहत आहेत. तर पूर्व भारतात बिहारपासून तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  शुक्रवारी (ता. २३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.६ (१२.४), नगर ३८.६(१४.३), जळगाव ३६.२(२०.०), कोल्हापूर ३५.७ (१८.५), महाबळेश्वर ३०.२(१४.०), मालेगाव ३७.०(१८.२), नाशिक ३३.०(१६.४), सांगली ३७.१(१७.१), सातारा ३५.३(१३.९), सोलापूर ३७.६(२०.३), मुंबई ३१.०(२३.०), रत्नागिरी ३३.०(२०.४), डहाणू २९.६(२०.६), भिरा ३९.०(१७.०), औरंगाबाद ३४.४(२०.२), परभणी ३८.०(१९.७), नांदेड ३९.०(१८.०), अकोला ३७.५(२०.५), अमरावती ३६.८(१९.०), बुलडाणा ३४.२(२१.०), चंद्रपूर ३९.०(२१.४).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT