brinjal  
मुख्य बातम्या

वांग्यांना ना दर, ना मागणी 

गेल्या काही दिवसांत कोरोना रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा फटका भाजीपाल्याला पुन्हा एकदा बसू लागला आहे.

टीम अॅग्रोवन

अकोला ः गेल्या काही दिवसांत कोरोना रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा फटका भाजीपाल्याला पुन्हा एकदा बसू लागला आहे. लग्नसोहळे, हॉटेल्स, खाणावळी बंद असल्याने भाजीपाल्याची मागणी कमालीची घटली असून, वांग्यांचा दर तर अवघा २०० ते ५०० रुपये क्विंटलदरम्यान खाली आला आहे. दुसरीकडे माल अधिक निघत असून, बाजारात या मालाची विक्रीसुद्धा होत नसल्याने नवीन पेच तयार झाला. 

उन्हाळ्याच्या दिवसांत पालेभाज्या कमी होतात. दुसरीकडे या काळात लग्नसोहळे होत असल्याने वांग्यांना मागणी वाढलेली असते. मागील वर्षापासून कोरोनाच्या कारणाने लग्नसोहळेच मर्यादित झाले आहेत. यंदा पुन्हा संसर्ग वाढल्याने प्रशासनाने लग्नसोहळ्यांना केवळ २५ जणांची परवानगी दिली, तर हॉटेल्स, खाणावळीमध्ये जेवणावळीवर बंधने घातली. आठवडी बाजार बंद आहेत. शहरात काही विशिष्ट वेळेतच विक्रीची मुभा दिली आहे. सर्वच बाजूंनी अशा प्रकारचे निर्बंध आल्याचा थेट फटका आता भाजीपाला उत्पादकांना बसत आहे. 

येथील बाजारात वांगी दोनशेपासून पाचशे रुपयांदरम्यान प्रतिक्विंटल विकत असल्याचे सांगण्यात येते. एवढ्या कमी दरांमध्ये शेतकऱ्यांना वाहतूक व इतर खर्चही निघेनासा झाला. दुसरीकडे पीक व्यवस्थापनावर मोठा खर्च झालेला असल्याने तो कसा काढावा हा पेचच आहे.  प्रतिक्रिया  आम्ही तीन दिवसांपूर्वी काळ्या वांग्यांच्या बॅग अकोला बाजारात विक्रीसाठी पाठविल्या होत्या. उठाव नसल्याने दोन दिवस ही वांगी पडून होती. आता फेकून देण्याची वेळ आली. शेतात माल मोठ्या प्रमाणात निघत असून, कुठे व कोणाला विकावा हा पेच तयार झाला आहे. साधी व भरताची अशा दोन्ही प्रकारच्या वांग्यांना ना दर आहे ना मागणी.  -प्रमोद राठोड, दगडपारवा, जि. अकोला 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana E-KYC : पूरग्रस्त महिलांसाठी दिलासा! ‘लाडकी बहीण’ योजनेची ई-केवायसी मुदत १५ दिवसांनी वाढवली

Rabi Season Crop Planning : कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजन

PM Kisan Yojana : पीएम किसान निधीच्या २१ व्या हप्त्यापूर्वी ३१ लाख शेतकऱ्यांची नावे वगळली?; केंद्राचे मोठे पाऊल

Nutritional Benefits of Moringa : मूल्यवर्धनासाठी उपयुक्त शेवगा

Farm Loan Waiver: शेती कर्जमाफीची अनिवार्यता!

SCROLL FOR NEXT