संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

कात्रज मिठाईसाठी वापरणार नायट्रोजन पॅकिंग तंत्रज्ञान

टीम अॅग्रोवन

पुणे  : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात कात्रजने आता मिठाईसाठी नायट्रोजन पॅकिंग तंत्राचा वापर करण्यास सुरवात केली. आधुनिक तंत्राचा वापर करणारा सहकारातील हा पहिलाच संघ आहे. 

कात्रज संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी उपपदार्थांची बाजारपेठ वाढविण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यामुळे संघाने इटली येथे तयार झालेले अत्याधुनिक मॉडिफाइड अॅटमोसफेरिक प्रेशर युनिट खरेदी केले आहे. 

‘‘नव्या पॅकिंग युनिटमध्ये मिठाई पॅक करताना ऑक्सिजनचे प्रमाण शून्यावर नेले जाते. याचवेळी ३० टक्के कार्बनडाय ऑक्साईड आणि ७० टक्के नत्राचे प्रमाण असलेल्या वातारणात मिठाई पॅक केली जाते. यामुळे मिठाईची टिकवण क्षमता एक महिन्याने वाढली आहे,’’ अशी माहिती कात्रज संघाचे व्यवस्थापक एस. ए. कालेकर यांनी दिली. 

राज्यात चितळे डेअरी, तसेच हल्दिराम या मिठाई उत्पादकांनी नायट्रोजन पॅकिंगचा वापर सुरू केला आहे. तथापि, सहकारी दूध संघांमध्ये कात्रजने आघाडी घेतली आहे. नायट्रोजन पॅकिंग युनिटकरिता पहिल्या टप्प्यात २५ लाख रुपयांची गुंतवणूक कात्रज संघाने केली आहे. 

‘‘कात्रज संघाची मिठाई नायट्रोजन पॅकिंगमधून मिळू लागल्यानंतर बाजारपेठेत गुणवत्ता अजून वाढेल. त्यातून होणाऱ्या नफ्यामुळे सभासद शेतकऱ्यांना अजून चार पैसे जादा मिळतील. पहिल्या टप्प्यात पेढे, बर्फी व इतर उत्पादनांसाठी या तंत्राचा वापर केला जाईल,’’ अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी दिली. 

नायट्रोजन पॅकिंगमुळे नैसर्गिक हवा पूर्णतः काढून घेतली जाते. त्यामुळे मिठाईत जिवाणू तयार होत नाहीत. एक महिन्यानंतर मिठाईचा बॉक्स उघडला तरी पहिल्या दिवशीची चव, स्वाद, रंग असे सर्व गुणधर्म मिठाईत आढळतात, असा कात्रज संघाचा दावा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT