Nimbhora Kolhapuri dam Get the job done quickly 
मुख्य बातम्या

निंभोरा कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम तातडीने पूर्ण करा

निंभोरा गावाजवळ साकारत असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याआहेत.

टीम अॅग्रोवन

अकोलाः निंभोरा गावाजवळ साकारत असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम तातडीने पूर्ण करा, तसेच शेतीच्या माहितीसाठी ग्रामस्थांना रस्त्याचे बांधकाम करून द्यावे अशा सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी केली. अधिकाऱ्यांसह त्यांनी बंधारा बांधकामस्थळी भेट देऊन आढावा घेतला.  मौजे निंभोरा गावाजवळ तत्कालीन शासनाकडे विशेष मागणी करून सुमारे २.६३ कोटी रुपयांचा कोल्हापुरी बंधारा आमदार सावरकर यांनी मंजूर करून घेतला. खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण व्हावी यासाठी तत्कालीन जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या दौऱ्याची आखणी केली होती. या दौऱ्यामध्ये ८ नोव्हेंबर २०१७ रोजी आमदार सावरकर यांनी सदर बंधारा मंजूर करण्याची मागणी केली.  त्यानंतर सुरू झालेल्या बंधाऱ्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्‍हा जलसंधारण अधिकारी श्री. गीते, उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री. वानरे, शासकीय कंत्राटदार तसेच स्‍थानिक ग्रामस्‍थांसह त्यांनी कामाच्‍या प्रगतीची पाहणी केली. बंधारा खारपाण पट्टयात येत असल्‍याने बंधारा पावसाळ्यातील पुराच्या पाण्‍यात स्थिर राहावा याकरिता बंधाऱ्याच्‍या की वॉल व विंग वॉल आवश्‍यकतेप्रमाणे वाढविण्‍यात याव्‍यात. बंधाऱ्यापासून गावाकडे असणारा तसेच पैल तिराकडे जाणारा रस्‍ता अशा आवश्‍यक असलेल्‍या किमान ५०० मीटर लांबीमध्‍ये रस्‍त्‍याचे बांधकाम करण्‍यात यावे. उपरोक्त कामांच्या प्रस्तावाला शासन स्तरावरून तातडीने मान्यता घेऊन कामे पूर्ण करण्यात यावीत, असेही त्यांनी सुचवले. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेवराव भुईभार, जिल्हा परिषद सदस्य तुकाराम दाबेराव, उपसरपंच अतुल आवारे, ताथोड गुरुजी, राजेश दिगंबर भुईभार, भरत काळमेघ, विनय भटकर, गणेश काळमेघ, राजेश पंजाबराव भुईभार, केशव ताठे, गजानन राजभाट, रमेश ताठे, मनोज गावंडे, प्रमोद भुईभार, शरद ताथोड, लव भटकर आदी उपस्थित होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT