औरंगाबाद, बीड, लातूर व उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील ८४ मंडळांत दुसऱ्या दिवशी पाऊस 
मुख्य बातम्या

मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ८४ मंडळांत दुसऱ्या दिवशी पाऊस

टीम अॅग्रोवन

लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर व उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील ८४ मंडळांत सलग तिसऱ्या दिवशीही मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. लातूर जिल्ह्यातील पोहरेगाव मंडळात सर्वाधिक ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील फूलंब्री तालुक्‍यातील दोन, सिल्लोड तालुक्‍यातील पाच, सोयगाव तालुक्‍यातील तीन, वैजापूर तालुक्‍यातील चार, गंगापूर तालुक्‍यातील दोन, कन्नड तालुक्‍यातील दोन व खुल्ताबाद तालुक्‍यातील एका मंडळात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वाधिक ५४ मिलिमीटर पाऊस गंगापूर तालुक्‍यातील हर्सूल मंडळात नोंदला गेला. बीड जिल्ह्यात बीड तालुक्‍यातील २, पाटोदा, आष्टी, परळी तालुक्‍यातील प्रत्येकी १, गेवराई व अंबाजोगाई तालुक्‍यातील प्रत्येकी ४ तालुक्‍यात पाउस झाला. 

अंबाजोगाई तालुक्‍यातील बर्दापूर मंडळात सर्वाधिक ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. लातूर तालुक्‍यातील ७, रेणापूर तालुक्‍यातील ४, उदगीर, जळकोट, शिरूर अनंतपाळ तालुक्‍यातील प्रत्येकी २, निलंगा तालुक्‍यातील ३, चाकूर व अहमदपूर तालुक्‍यातील प्रत्येकी ५ मंडळात पाऊस झाला. सर्वाधिक ५० मिलिमीटर पाऊस रेणापूर मंडळात, तर त्यापाठोपाठ पानगाव मंडळात ३० मिलिमीटर पाऊस बरसला. 

उस्मनाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा व वाशी तालुक्‍यात प्रत्येकी दोन, तर उस्मानाबाद तालुक्‍यातील ६ मंडळात पावसाची हजेरी लागली. उस्मानाबाद तालुक्‍यातील जागजी मंडळात  सर्वाधिक ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cable Thieves Arrested : शेतकऱ्यांच्या मोटारीचे केबल चोरणारे जेरबंद

Fruit Crop Insurance: फळ पीकविमा योजनेतून परताव्यांबाबत संभ्रम

Solapur Drought : सोलापूरवर दुष्काळाचे सावट; पावसाची ५३ टक्के तूट

MPSC Agriculture Recruitment: कृषी सेवा मुख्य परीक्षेतील शिफारसप्राप्त उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

Rabi Sorghum: धान्य आणि चाऱ्यासाठी रब्बी ज्वारीच्या लागवडीचं संपूर्ण नियोजन

SCROLL FOR NEXT