A new variety of ‘Godavari’ trumpet developed 
मुख्य बातम्या

‘गोदावरी’ तुरीची नवी जात विकसित

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आयोजित ४८ व्या ‘जॉइंट ॲग्रेस्को’मध्ये बदनापूर कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या तुरीच्या गोदावरी (बीडीएन २०१३-४१) या जातीची महाराष्ट्रामध्ये लागवड करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे.

टीम अॅग्रोवन

बदनापूर, जि. जालना : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आयोजित ४८ व्या ‘जॉइंट ॲग्रेस्को’मध्ये बदनापूर कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या तुरीच्या गोदावरी (बीडीएन २०१३-४१) या जातीची महाराष्ट्रामध्ये लागवड करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या बदनापूर कृषी संशोधन केंद्राच्या यशात यामुळे मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या जातीच्या संशोधनाबाबत कडधान्य पैदासकार डॉ. दीपक पाटील म्हणाले की, या केंद्राने बीडीएन-२  ही दाण्याचा पांढरा रंग असलेली जात विकसित केली होती. परंतु ही जात मर रोगास बळी पडते. त्यामुळे काहीवेळा उत्पादनात घट येत होती. संशोधनासाठी बीडीएन-२ जातीचा आधार घेत आम्ही २०१० पासून नवीन जात विकसित करण्यास सुरुवात केली. दहा वर्षांनी आम्ही गोदावरी (बीडीएन २०१३ - ४१) ही जात विकसित केली आहे.

जातीची वैशिष्ट्ये

  • सिंचनाची सोय असलेल्या भागासाठी शिफारस.
  • १६०-१६५ दिवसांचा कालावधी.
  • मर, वांझ रोगास प्रतिबंधक.
  • फुले पिवळसर पांढरी आणि दाण्याचा रंग पांढरा.
  • १०० दाण्यांचे वजन सरासरी ११ ग्रॅम.
  • हेक्टरी उत्पादन ः १,९५०-२,४५० किलो.
  • एका पाण्याची हमखास सोय असेल, तर लागवडीची शिफारस.
  • कोरडवाहू क्षेत्रात पेरणी करायची असेल, तर भारी जमिनीमध्येच लागवडीची शिफारस.
  • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांचे भक्कम पाठबळ आणि संशोधन संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही जात प्रसारित झाली आहे. संशोधनासाठी प्रा. विष्णू गिते यांचेही मोलाचे योगदान लाभले आहे. — डॉ. दीपक पाटील, कडधान्य पैदासकार, कृषी संशोधन केंद्र, बदनापूर  

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Minister Caught Gaming: ऐसे कैसे झाले भोंदू

    Manikrao Kokate News : रमी प्रकरण, पिकविमा, ढेकळाचे पंचनाम्यावर कृषिमंत्री कोकाटेंचं स्पष्टीकरण

    Desi Cow Management: आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण गोशाळा हेच धोरण

    Rajya Gomata Day: गोशाळा बनतील शाश्वत विकासाचे केंद्र

    Manikrao Kokate Rummy Video : रमी खेळण्याचा विषय छोटा; बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे

    SCROLL FOR NEXT