New peak loans to 6,000 farmers
New peak loans to 6,000 farmers 
मुख्य बातम्या

सहा हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज 

टीम अॅग्रोवन

परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी हंगामातील पहिल्या तीन महिन्यांत मंगळवारपर्यंत (ता.३०) विविध बॅंकांनी १३ हजार ८१ शेतकऱ्यांना १२३ कोटी १५ लाख रुपये (२०.२९ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. आजवर ६ हजार ३४८ शेतकऱ्यांना ५९ कोटी ९६ लाख रुपये एवढे नवीन पीककर्ज देण्यात आले. तर ६ हजार ७३३ शेतकऱ्यांनी ६३ कोटी १९ लाख रुपये पीककर्जाचे नुतनीकरण करून घेतले आहे. खरिपाप्रमाणेच रब्बी हंगामातही पीककर्जाचे वाटप रखडत चालले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बॅंकांमध्ये चकरा माराव्या लागत आहेत. वेळेवर पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.  या वर्षी रब्बी हंगामात जिल्ह्यातील बॅंकांना ६०६ कोटी ९८ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यात राष्ट्रीयकृत बॅंकांना २६१ कोटी ९९ लाख रुपये, खासगी बॅंकांना ३४ कोटी २० लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला ६३ कोटी १४ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला २४७ कोटी ६५ लाख रुपये एवढ्या उद्दिष्टाचा समावेश आहे. आजवर राष्ट्रीयकृत बॅंकांनी १० हजार ८४४ शेतकऱ्यांना १०२ कोटी ९९ लाख रुपये (३९.३१ टक्के), खासगी बँकांनी १५४ शेतकऱ्यांना २ कोटी ४८ लाख रुपय (७.२५ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने २ हजार ८३ शेतकऱ्यांना १७ कोटी ६८ लाख रुपये (२८ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने कर्ज वाटप सुरू केले नाही. 

असे आहे पीककर्ज वाटपाचे चित्र  १३ हजार ८१ शेतकऱ्यांना १२३ कोटी १५ लाखांचे पीककर्ज वाटप  ६ हजार ३४८ शेतकऱ्यांना ५९ कोटी ९६ लाखांचे नवीन पीककर्ज  ६ हजार ७३३ शेतकऱ्यांकडून ६३ कोटींच्या पीककर्जाचे नूतनीकरण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

SCROLL FOR NEXT