Nanded, Parbhani, Hingoli, Guaranteed Purchase of 3 thousand quintals
Nanded, Parbhani, Hingoli, Guaranteed Purchase of 3 thousand quintals 
मुख्य बातम्या

नांदेड, परभणी, हिंगोलीत हमीभावाने १७ हजार क्विंटल तूर खरेदी

टीम अॅग्रोवन

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गंत हमीभावाने (प्रतिक्विंटल ५८०० रुपये) तूर विक्रीसाठी राज्य सहकारी पणन महासंघ आणि विदर्भ सहकारी पणन महासंघअंतर्गत २३ खरेदी केंद्रांवर शनिवार (ता. २९) पर्यंत ३९ हजार ९२९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. या तीन जिल्ह्यांतील २ हजार १२३ शेतकऱ्यांची १७ हजार १.९४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. 

हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी यावर्षी (२०१९-२०) नाफेड तर्फे राज्य सहकारी पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ, महाएफपीसी यांच्यामार्फत शेतकऱ्यांची नोंदणी केली जात आहे. नांदेड जिल्ह्यात जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाअंतर्गत नांदेड, हदगाव, किनवट, मुखेड केंद्रांवर शनिवार (ता. २९) पर्यंत ८ हजार ८ शेतकऱ्यांनी तर विदर्भ सहकारी महासंघाच्या भोकर, धर्माबाद, नायगाव येथील केंद्रावर २ हजार ८९० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाअंतर्गंत २५१ शेतकऱ्यांची ९९१.८५ क्विंटल आणि विदर्भ सहकारी पणन महासंघातर्फे १९३ शेतकऱ्यांची ९९३.५० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

राज्य सहकारी पणन महासंघअंतर्गत जिल्हा पणन अधिकारी कार्यालयातर्फे परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा या सात केंद्रांवर मिळून एकूण १४ हजार १ शेतकऱ्यांनी आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कन्हेरगाव, कळमनुरी, वसमत, जवळाबाजार, सेनगाव, साखरा येथील केंद्रांवर मिळून एकूण ११ हजार ७४९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

विदर्भ सहकारी महासंघातर्फे परभणी जिल्ह्यातील मानवत आणि गंगाखेड येथील केंद्रांवर ३ हजार २८१ शेतकऱ्यांची ऑनलाईइन नोंदणी केली आहे. पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यात ४३७ शेतकऱ्यांची ४ हजार २४५.१९ क्विंटल आणि विदर्भ सहकारी महसंघातर्फे ४९९ शेतकऱ्यांची ४ हजार २७६.५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात पणन महासंघातर्फे ७४५ शेतकऱ्यांची ६ हजार ४९४.९० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. नोंदणीच्या तुलनेत खरेदीचा वेग कमी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT