In Nanded district, sowing of summer groundnut on four and a half thousand hectors
In Nanded district, sowing of summer groundnut on four and a half thousand hectors  
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची साडेचार हजार हेक्टरवर पेरणी

टीम अॅग्रोवन

नांदेड : यंदा उन्हाळी हंगामात जिल्ह्यात गुरुवार (ता. २०) पर्यंत ४ हजार ६०३ हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात एकूण ५ हजार ४६९ हेक्टरवर (८७.६४ टक्के) उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील उन्हाळी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ६ हजार २४० हेक्टर आहे. या हंगामात भुईमूग, ज्वारी, मका, तांदूळ, तीळ आदी पिके घेतली जातात. सिंचन स्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळी हंगामातील क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे.

गुरुवार (ता. २०) पर्यंत पेरणी झालेल्या क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे ४ हजार ६०३ हेक्टरवर भुईमूग, ५९६ हेक्टरवर ज्वारी, २७० हेक्टरवर मका या पिकांची पेरणी झाली आहे.

उन्हाळ्यातील नगदी पीक म्हणून भुईमुगाला शेतकऱ्यांनी अधिक प्राधान्य दिले आहे. ज्वारी, मका या अन्नधान्य, चारा पिकांची पेरणी झाली आहे. कंधार तालुक्यात उन्हाळी पिकांचे पेरणी क्षेत्र सर्वाधिक आहे. मुदखेड तालुक्यात उन्हाळी पिकांच्या पेरणी क्षेत्राची अद्याप नोंद झाली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT