...तर मग मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा : पटोले
...तर मग मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा : पटोले 
मुख्य बातम्या

...तर मग मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा : पटोले

टीम अॅग्रोवन

नागपूर : शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी माजी खासदार नाना पटोले यांनी केली आहे. रावल सहकारी बॅंकेचे दरोडा प्रकरण दडपणारे मुख्यमंत्री मिस्टर क्लीन कसे, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.  धर्मा पाटील सरकारी यंत्रणेचे बळी ठरले. त्यांनी काही विशिष्ट व्यक्‍तींनाच जादा मोबदला दिल्याचे सांगून आपल्याला अत्यल्प मोबदला दिल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र दखल घेण्यात आली नाही. यामुळे त्यांनी मंत्रालयात विष घेतले. दोंडाई नगरपालिका हद्दीत अमरावती नदीच्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नगराध्यक्ष, आरोग्य सभापती, बांधकाम सभापती, इंजिनीनिअर, आरोग्य निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच न्यायालयाने धर्मा पाटील प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे निवेदन धुळे पोलिस अधीक्षकांकडे दिल्याची माहिती पटोले यांनी दिली. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत याचिका दाखल करणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले. या वेळी जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार उपस्थित होते.  रावल सहकारी बॅंकेत १५ कोटींच्या दरोडा प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिस निरीक्षक प्रदीप पाडवी यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. पथकाने चौकशी अहवालात ५६ लोकांना आरोपी केले. यात मंत्री जयकुमार रावल यांच्यासह आमदाराचाही सहभाग आहे. मात्र कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी सीआयडीकडे नव्याने चौकशी सोपविली. हा प्रकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा आहे, असेही पटोले म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT