mushroom
mushroom 
मुख्य बातम्या

मशरुम उद्योगाचे लाखोचे नुकसान 

टीम अॅग्रोवन

अकोला ः सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे येथील मशरुम व्यवसायाला लाखोंचा फटका बसला आहे. गेल्या दीड महिन्यापासून हॉटेल, धाबे हा व्यवसाय बंद असून संचारबंदीमुळे इतर प्रतिष्ठानेही उघडल्या गेलेली नाही. त्यामुळे मशरुम विक्री पुर्णतः ठप्प झाली. उत्पादीत होत असलेले मशरुम जनावरांना खाऊ घालण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.  विदर्भात अळिंबी (मशरुम) उद्योगाला ओळख तयार करण्याचे काम अकोल्यातील श्‍याम यादव, आनंद गडे आणि रवी तेलंग या तीन मित्रांनी केले. गेल्या १५ वर्षांपासून ते ‘विठ्ठल' नावाचा मशरुम ब्रॅंड यशस्वीपणे चालवित आहेत. हा व्यवसाय कोरोनामुळे पहिल्यांदा ठप्प पडला आहे. दररोज चारशे किलोचे उत्पादन असलेल्या मशरुमपैकी गेल्या दीड महिन्यात बहुतांश माल विक्री होऊ शकला नाही.  विठ्ठल मशरुम अकोल्यासह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तसेच मुंबई, अहमदाबाद, बडोदा, सुरत, इंदोर, रायपूर, हैदराबाद, भोपाळ, टाटानगर, राहुलकेला (ओरिसा) शहरांमध्ये पाठविले जाते. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून मशरुम उत्पादनाला झळ बसणे सुरु झाली. लॉकडाऊनमुळे वाहतुक व्यवस्था ठप्प असल्याने तसेच बाजारपेठेत मागणी नसल्याने मोठा पेच तयार झाला.  मशरुम उत्पादनासाठी तीन महिने कालावधीची एक बॅच राहते. एक महिना कंपोस्ट तयार होण्यास लागतो तर २५ ते २८ दिवस हार्वेस्टींगला लागतात. मार्च, एप्रिल, मे या तीनही महिन्याच्या प्रत्येकी चार बॅचेस लावण्यात आल्या होत्या. त्यापैकी पहिल्या बॅचमधील माल सुरु झालेला होता. मात्र, १८ मार्चपासून जसा बंद सुरु झाला तसतसे हे संकट वाढू लागले.  मार्च महिन्यात ४ हजार १५० किलो मशरुम विक्री झाले नाही. पाच लाख ३९ हजारांचे नुकसान झाले. तर एप्रिलमध्ये १० हजार २८० किलो मशरुम फेकून द्यावे लागले. १३ लाख ३६ हजारांची झळ सहन करावी लागली. आता मे महिन्यातही नुकसानाचे चक्र सुरु आहे. आतापर्यंत २० लाखांवर नुकसान झाले. सध्या विक्रीची स्थिती सुधारण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे विक्री नसताना खर्चाचेही चक्र फिरते आहे. महिन्याला अडीच लाखांपेक्षा अधिक वीज बील येते. शिवाय मजुरांचे पगार चुकवावे लागत असल्याचे या मशरुमचे संचालक आनंद गडे म्हणाले. 

मशरुम द्यावे लागले फेकून  लॉकडाऊन सुरु होताच मजुर येणे बंद झाले. त्यामुळे काढणीला आलेले मशरूम जागेवरच काळवंडले. ते काढायलाही मजुर मिळत नव्हते. सुरुवातीला वाळविण्याचा प्रयत्न केला. परंतु उत्पादन अधिक असल्याने ते शक्य झाले नाही. शेवटी उत्पादीत माल काढून जनावरांना खाऊ घालावा लागला, असे आनंद गडे यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT