banana planting
banana planting  
मुख्य बातम्या

खानदेशात मृग बहारातील केळी लागवड पूर्णत्वाकडे

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात मृग बहार (जून व जुलैमध्ये लागवड) केळी लागवड पूर्णत्वाकडे आहे. यंदा क्षेत्र स्थिर राहणार असून, जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात सर्वाधिक १९ ते २३ हजार हेक्‍टरवर लागवड होण्याचा अंदाज आहे.  जळगाव जिल्ह्यात मृग बहरातील केळी लागवड अधिक असते. त्यात रावेरपाठोपाठ यावल, मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा व काही प्रमाणात चोपडा तालुक्‍यातही लागवड केली जाते. तसेच नंदुरबारमधील शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर तालुक्‍यातही मृग बहार केळीची लागवड झाली आहे. खानदेशात मिळून ४० ते ४२ हजार हेक्‍टरवर मृग बहारातील केळी लागवडीचा अंदाज आहे. ‘कोरोना’च्या संकटात केळीचे दर दबावात आहेत. यंदा ३०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मृग बहारातील केळीला मिळाला आहे. हे दर मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहेत. कारण ‘कोरोना’मुळे उत्तर भारतातील बाजारांमध्ये केळीची पाठवणूक रखडत सुरू असतानाच तेथील किरकोळ विक्रीवरही परिणाम दिसत आहे. रमजानमध्ये दरात किंचित सुधारणा झाली होती, पुन्हा दर कोसळले. दरात सुधारणा दिसत नसली तरी पुढे ‘कोरोना’चे संकट दूर होऊन केळीला मागणी वाढेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. लागवडीनंतर केळीची काढणी १० महिन्यांत सुरू होते. यामुळे पुढील १० महिन्यांत ‘कोरोना’चे संकट दूर होईल, असा विश्‍वासही शेतकऱ्यांना असून, केळीची लागवड स्थिर आहे. मध्यंतरी ढगाळ व थंड वातावरणात रावेर, मुक्ताईनगर भागात ऊतिसंवर्धित केळी रोपांची लागवड वेगात झाली. परंतु जसे ऊन तापत आहे, तसा रोपे लागवडीवर परिणाम झाला आहे.  कारण उष्णतेत रोपे तग धरण्याची प्रक्रिया मंद असते. नांग्या अधिक भराव्या लागतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जुलैच्या सुरवातीच्या आठवड्यातही लागवड सुरू राहील, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT