चांदवड येथे साडी नेसून आंदोलन 
मुख्य बातम्या

चांदवड येथे साडी नेसून आंदोलन

टीम अॅग्रोवन

नाशिक : चांदवड खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून खतांची बोगस विक्री व तालुक्यात काही स्वस्त धान्य दुकानांमधून मयत व दुबार लाभार्थींच्या नावावर मोठ्या प्रमाणावर धान्याचा अपहार झाल्याचा आरोप केला आहे. मात्र, सहकार कायद्याची अंमलबजावणी न करता पायमल्ली करून माहिती अधिकार अधिनियम २००५ या कायद्यान्वये माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. तसेच, सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही. या संबंधित जबाबदार प्रशासनाच्या निषेधार्थ माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे चांदवड कार्याध्यक्ष राजू खंगाळ हे सोमवारी (ता. २४) साडी नेसून आमरण उपोषणाला बसले आहेत.  शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी परवानाधारक दुकानांमध्ये दर्शनी भागात मूळ परवान्याची प्रत लावणे, दुकानातील शिल्लक साठा फलक लावणे, तसेच विक्री किमतीबाबतचा दर फलक लावणे आवश्यक आहे. परंतु, हे करण्याची तसदी कोणीही घेतलेली नाही. वेळोवेळी याबाबत संबंधित यंत्रणांकडे पत्र व्यवहार करूनही हेतूपुरस्करपणे कार्यवाहीस टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप खंगाळ यांनी केला आहे. सर्व संबंधित यंत्रणांमधील कारभाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: राज्यातील २१ जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

Mango Farmers: आंबा-काजू बागांच्या नुकसानीला ‘नैसर्गिक आपत्ती’ घोषित करा : शेट्टी

Farmers Issues: कापणी, मळणीचा खर्च शेतकऱ्यांना परवडेना

Power Wire Theft: वीजतारांच्या चोरीमुळे शेतकरी संकटात

LPG Shortage : "नागरिकांना घाबरू नका, असं आवाहन करणारे पंतप्रधान मोदीचं घाबरलेले आहेत"; एलपीजी गॅस टंचाईवरून लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका

SCROLL FOR NEXT