पुणे जिल्हयात बहुतांश भात उत्पादक भरपाईपासून राहणार वंचित
पुणे जिल्हयात बहुतांश भात उत्पादक भरपाईपासून राहणार वंचित  
मुख्य बातम्या

पुणे जिल्हयात बहुतांश भात उत्पादक भरपाईपासून राहणार वंचित

टीम अॅग्रोवन

पुणे : पीक विमा योजनेत भात उत्पादकांचा सहभाग कमी आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. सुमारे ८०० ते १००० हजार विमाधारक शेतकऱ्यांचा योजनेत सहभाग आहे. त्यांनी वेळेत नुकसानीची माहिती कळविल्यास नुकसान भरपाईसाठी पात्र ठरणार असल्याचे चित्र आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेत जिल्हयात ४१ हजार १३९ शेतकरी सहभागी झाले. विम्यापोटी २७ हजार ८४७ हेक्टरला संरक्षण मिळाले आहे. नुकसान झाल्यानंतर कंपनीकडून ७७ कोटी २६ लाख २६ हजार रूपयांची रक्कम मिळणार आहे. मात्र, यामध्ये भात उत्पादकांचा सहभाग कमी आहे. अनेक शेतकऱ्यांना नुकसानीच्या भरपाईपासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे.

यंदा जून-जुलै महिन्यात भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर, मूग, उडीद, भूईमूग अशा विविध पिकांसाठी विमा योजना राबविण्यात आली. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरताना तत्पर सेवा न मिळल्याने शेतकऱ्यांना वेंटिंगवर राहावे लागले. अर्ज भरताना आलेल्या अडचणी आणि गेल्या वर्षीची कमी मिळालेली नुकसानभरपाई, यामुळे योजनेस कमी प्रतिसाद मिळाला.

खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना अन्नधान्य व गळीत धान्य पिकांकरिता दोन टक्के, नगदी पिकांसाठी पाच टक्के विमा हप्ता होता. सध्या ज्या शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांनी पीक नुकसान सूचना फॉर्म, पीकविमा भरल्याची पावती आणि सात- बारा ही कागदपत्रे संबधित विमा कंपनी प्रतिनिधी, ग्रामपंचायत कार्यालय, सेतू सुविधा केंद्र, तलाठी कार्यालय यांच्याकडे सादर करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या तरच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea Brand : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT