माॅन्सून वाटचाल
माॅन्सून वाटचाल  
मुख्य बातम्या

विदर्भातून मॉन्सून परतला  

टीम अॅग्रोवन

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. १४) मोठा टप्पा पार करत देशाच्या बहुतांशी भागातून माघार घेतली. बहुतांश विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या उत्तरेकडील काही भागांतून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. गुरुवारपर्यंत (ता. १७) मॉन्सून संपूर्ण देशाचा निरोप घेण्याची शक्यता आहे. पूर्व आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रीय होण्याची संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.       

वायव्य भारतातील हवेच्या खालच्या थरात केंद्रभागी दाब अधिक असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती (ॲण्टी सायक्लोनीक सर्कुलेशन), सलग पाच दिवस पावसाची उघडीप, हवेतील बाष्पाचे कमी झालेले प्रमाण, वाऱ्यांची बदलेली दिशा आदी निरीक्षणानंतर मॉन्सूनने माघार घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मॉन्सूनने मंगळवारी (ता. १४) उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीमसह संपूर्ण ईशान्य भारत, छत्तीसगड, ओडिशासह दक्षिण भारतातील काही भागांतून माघार घेतली आहे. तर महाराष्ट्रातील विदर्भाचा बहुतांश भाग, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांतून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.   

यंदा देशात आठ दिवस उशिराने दाखल झालेला मॉन्सून महाराष्ट्रात सर्वांत उशिराने (२० जून) दाखल झाला. त्यानंतर चार दिवस उशिराने (१९ जुलै) मॉन्सूनने देश व्यापाला. आगमनाप्रमाणेच मॉन्सूनचा परतीचा प्रवास तब्बल सव्वा महिने लांबला. १ सप्टेंबर रोजी राजस्थानातून माघारी फिरणाऱ्या मॉन्सूनने सर्वांत उशिराने बुधवारी (९ ऑक्टोबर) रोजी राजस्थानातून मुक्काम हलविला. त्यानंतर सातत्याने परतीचा प्रवास सुरू ठेवत देशाच्या बहुतांशी भागातून काढता पाय घेतला. साधारणत: १५ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह देशभरातून माघारी फिरतो. दोन दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून, तर १७ ऑक्टोबरपर्यंत देशभरातून मॉन्सून परतणार असल्याचे  हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT