monsson advance
monsson advance  
मुख्य बातम्या

मॉन्सून १०१ टक्के बरसणार 

टीम अॅग्रोवन

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात (जून ते सप्टेंबर) १०१ टक्के पाऊस पडेल. तर पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या भागांत यंदा १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. संपूर्ण मॉन्सून हंगामाचा विचार करता महाराष्ट्रात यंदा चांगल्या पावसाचा अंदाज असून, मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी, तर कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. 

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंगळवारी (ता. १) हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी मॉन्सूनचा दुसरा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. हवामान विभागाने १६ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजात देशभरात ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. १९६१ ते २०१० कालावधीत देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८८ सेंटिमीटर, म्हणजेच ८८० मिलिमीटर आहे. तर सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो. आयएमडीच्या मल्टीमॉडेल एन्सेंबल फोरकास्टिंग सिस्टिमनुसार (एमएमई) यंदा सरासरी इतक्या (९६ ते १०४ टक्के) पावसाची शक्यता आहे. 

‘स्टॅटेस्टिकल एन्सेंबल फोरकास्टिंग सिस्टिम’(एसईएफएस) मॉडेलचा वापर करून मॉन्सून हंगामातील पावसाचा अंदाज वर्तविला आहे. सुधारित अंदाजानुसार मॉन्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक ४० टक्के, तर दुष्काळाची शक्यता ८ टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. या  अंदाजात चार टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. 

एल निनो स्थिती सर्वसामान्य  विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या सर्वसामान्य एल निनो स्थिती आहे. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेल्सनुसार मॉन्सून हंगामात ही स्थिती कायम राहणार आहे. यातच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (आयओडी – इंडियन ओशन डायपोल) सध्या सर्वसामान्य आहे. मॉन्सून हंगामातही ही स्थिती नकारात्मक होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  जूनमध्ये विदर्भात अधिक, मराठवाड्यात कमी पाऊस  भारतीय हवामान विभागाने यंदा प्रथमच जून महिन्याचा अंदाज जाहीर केला आहे. जून महिन्यात मॉन्सूनच्या आगमनाचा कालावधी असल्याने हवामानात वेगाने बदल होत असतात. त्याचा पावसाच्या वितरणावरही परिणाम होतो. यंदाच्या जून महिन्यात देशात ९२ ते १०८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता गृहीत धरण्यात  आली आहे. महाराष्ट्राचा विचार करता यंदाच्या जून महिन्यात मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर कोकण आणि विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.  प्रतिक्रिया मॉन्सूनचे आगमन जाहीर करण्यासाठी आकाशातील ढगांचे आच्छादन, पावसाची हजेरी आणि जमिनीलगत तसेच ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत नैर्ऋत्येकडून वारे वाहणे आवश्यक आहे. ही स्थिती नसल्याने केरळातील मॉन्सून आगमनाची वेळ बदलावी लागली. मॉन्सून तीन जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होईल.  - डॉ. मृत्युंजय महापात्रा, महासंचालक, हवामान विभाग, नवी दिल्ली 

हवामान विभागनिहाय पावसाचा अंदाज (टक्क्यांत)  ९२ ते १०८  वायव्य भारत  १०६  मध्य भारत  ९३ ते १०७  दक्षिण भारत  ९५  ईशान्य भारत   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane FRP : सोलापुर जिल्ह्यात २५७ कोटींची ‘एफआरपी’ थकित

Vegetable Production : भाजीपाला उत्पादनाचे गणित बिघडले

Summer Heat : उन्हाच्या तीव्रतेचा फळे, भाजीपाला उत्पादनावर परिणाम

Crop Damage Subsidy : पीकनुकसानीचे ८८ कोटींवर अनुदान ‘अपलोड’

Dungmanure Shortage : बागायतदारांना शेणखताचा तुटवडा

SCROLL FOR NEXT