मुलाच्या शिक्षणसाठी जमवलेले पैसे चोरले
मुलाच्या शिक्षणसाठी जमवलेले पैसे चोरले 
मुख्य बातम्या

मुलाच्या शिक्षणसाठी जमवलेले पैसे चोरले

सकाळ वृत्तसेवा

आर्वी, जि. वर्धा : शेतकऱ्याने सोने गहाण ठेवून मुलाच्या शिक्षणासाठी काढलेले पैसे चोरट्याने हिसका मारुन पळविल्याची घटना साइनगर येथे सायंकाळी नुकतीच (ता. ४) घडल्याने एकच खळबळ उडाली. प्रफुल्ल वानखेडे (रा. आर्वी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी या त्यांनी सोने गहाण ठेवून नादुरा बँकेतून १ लाख २५ हजाराची उचल केली. ही रक्कम त्यांना त्यांचे शिक्षक मित्र मनोहर सावरकर (रा. साईनगर) यांना द्यायची होती. ते या शिक्षकाच्या घरी गेले असताना ते घरी नसल्याने वानखेडे यांनी भ्रमणध्वनीवरुन बोलत असताना पाळतीवर असलेल्या एका युवकाने त्यांच्या दुचाकीवर समोर असलेल्या पैशाच्या पिशवीला हिसका मारुन पोबारा केला. त्याने काळी पँट आणि गुलाबी शर्ट घातला होता. पुढे हा चोर नाल्यातून पळून गेला.  प्रफुल्ल  वानखेडे आणि मनोहर सावरकर या दोघांची मुले कोटा (राजस्थान) येथे शिक्षण घेत आहेत. सावरकर हे शनिवार (ता. ५) ला कोटा येथे जात असल्याने त्यांच्याजवळ मुलांसाठी वानखेडे यांना पैसे द्यायचे असल्याने ही रक्कम सोने ठेवून घेण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अशोक चौधरी यांनी पथकासह तपास सुरु केला मात्र तपास लागला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT