Money of 36 Gram Panchayats stuck in Karnala Bank
Money of 36 Gram Panchayats stuck in Karnala Bank 
मुख्य बातम्या

कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे अडकले

टीम अॅग्रोवन

मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत पनवेल तालुक्यातील  ३६ ग्रामपंचायतींचे तब्बल ९ कोटी रुपये अडकले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींना कामे करणे अवघड झाले आहे. 

कर्नाळा नागरी सहकारी बँकेत ५१२ कोटी ५४ लाख ५३ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी सहकार विभागाने बँकेवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीच्या माध्यमातून सुरु आहे. फेब्रवारी २०१९ मध्ये बँक घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासह संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बोगस कर्जदार अशा एकूण ७६ जणांवर गुन्हा दाखल केला. 

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने विशेष लेखा परीक्षण करण्याचे आदेश दिल्यानंतर रायगड जिल्हा सहकारी संस्थेचे वर्ग-१ चे विशेष लेखा परीक्षक उमेश तुपे यांनी कर्नाळा बँकेचे लेखा परीक्षण केले. तपासणीत ६३ बोगस कर्जदार तयार करुन, तसेच अनेक कर्ज प्रकरणात बनावट कागदपत्रे वापरुन, बँकेतील कोट्यवधी रुपयांचा अपहार करून ठेवीदारांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले.

बँकेच्या संचालक मंडळाने व कर्जदारांनी गैरव्यवहार करुन ६३३ कोटींपैकी ५१२ कोटी ५४ लाख ५३ हजार रुपयांचा अपहार केल्याने बँकेची स्थिती डबघाईला आली, असा ठपका ठेवण्यात आला.

बँकेची स्थिती दोन वर्षांपासून डबघाईला येत असल्याचे लक्षात येताच प्रशासनाने मोठी रक्कम काढू दिली नाही. घोटाळ्यामुळे किरकोळ खातेदार अडचणीत आले. सोबत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे पैसेदेखील यामध्ये अडकले. तालुक्यातील राजकीय विरोधक असलेल्या भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायतींचे पदाधिकारी या विरोधात उघडपणे आवाज उठवत आहेत, शेकापकडील ग्रामंपचायतींच्या पदाधिकाऱ्यांची  स्थिती  अवघड आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT