दूधदराबाबत सोमवारी आंदोलन  Monday agitation over milk price 
मुख्य बातम्या

दूधदराबाबत राज्यात सोमवारी आंदोलन 

दीड महिन्यांपूर्वी दूध विकास मंत्र्यांसोबत बैठक होऊनही दरवाढ केली नसल्यानेसोमवारी, ९ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम अॅग्रोवन

नगर : लॉकडाउनच्या आधी दुधाला ३२ ते ३५ रुपये प्रती लिटर दर मिळत होता. मात्र लॉकडाउन नंतर दर थेट २२ रुपयांवर आला. दीड महिन्यांपूर्वी दूध विकास मंत्र्यांसोबत बैठक होऊनही दरवाढ केली नसल्याने राज्यात पुन्हा एकदा किसान सभा, राज्य दूध उत्पादक संघर्ष समितीने दूध दरासाठी सोमवारी, ९ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळीही दूध संकलन केंद्र हेच आंदोलनाचे केंद्र असेल. मागण्यांची तीव्रता सरकारला गांभीर्याने कळावी, यासाठी सोशल मीडिया, प्रसार माध्यमाची मदत घेतली जाणार आहे.  दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची बुधवारी (ता.४) ऑनलाइन बैठक झाली. किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे, डॉ, अजित नवले, ज्योतिराम जाधव, यांच्यासह कार्यकर्ते व नेते सहभागी झाले होते. 

सोळा जिल्ह्यांत होणार तीव्र आंदोलन दूधदराच्या आंदोलनात नगर, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, जालना, बुलढाणा, लातूर, ठाणे, जळगावसह सोळा जिल्ह्यांत प्रामुख्याने दूध आंदोलनाचा जोर असेल. नऊ  ऑगस्टला सकाळी आंदोलक दूध केंद्रावर येऊन निदर्शने करतील. सरकाररुपी दगडाला अभिषेक घालून निषेध करतील. दुपारी तहसीलदारांना निवेदन दिले जाईल. आंदोलनाचे जास्तीत फोटो, व्हिडिओ, मेल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व दुधविकास मंत्र्याना पाठवून दूधदराची तीव्रता कळवली जाणार आहे. दुधविकास मंत्री व खासगी संघाचे प्रतिनिधी यांची मंत्रालयात बैठक होऊन दीड महिना झालातरी दराबाबत निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांत संताप आहे. 

देशव्यापी संघटनाचे नियोजन  दुधाचा प्रश्न केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आहे. त्यामुळे अखिल किसान सभेच्या माध्यमातून देशव्यापी संघटन करण्याचे नियोजन केले आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, हरियाना, पंजाबमधील शेतकरी नेते, संघटनांना एकत्र करून संघटन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. अजित नवले यांनी सांगितले. अशा आहेत मागण्या

  • दुधाला लॉकडाउन पूर्वी प्रती लिटर ३५ रुपये दर होता. तो पूर्ववत करावा, दुधाला एफआरपी कायदा लागू करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने नोट तयार केली असून, त्याला तातडीने मंजुरी देऊन कायदा करावा. 
  • दूध व्यवसायात उसाप्रमाणे ८०-२० फॉर्म्युला करावा 
  • खासगी आणि सरकारी लूटमार विरोधी कायदा करावा
  • महाहाराष्ट्रात एक राज्य एक ब्रॅण्ड संकल्पना तातडीने अमलात आणावी. सदोष मिल्कोमीटरमधून होणारी दूध उत्पादकांची लूटमार थांबवा.
  • तालुकावार मिल्कोमीटर तपासणी अधिकारी नियुक्ती करा
  • जनावरांचे विमा शासनाच्या वतीने उतरवण्याची योजना पुन्हा सुरू करा
  • दुधातील भेसळ रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    MSP Protection : शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण देणे शक्य आहे का?

    Pune APMC : ...तर पुणे बाजार समितीला लागलेले ग्रहण सुटेल

    Trump India Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचे आयात कर अस्त्र

    Rain Crop Damage : मुसळधारेने काही तासांत होत्याचे नव्हते

    Onion Rate Crisis : कशी फुटेल कांदादर कोंडी?

    SCROLL FOR NEXT