Minister of State Kadu Suspended two officers
Minister of State Kadu Suspended two officers 
मुख्य बातम्या

राज्यमंत्री कडू यांचा कामचुकार अधिकाऱ्यांवर ‘प्रहार’

टीम अॅग्रोवन

अमरावती ः सर्वसामान्य नागरिकांच्या कामात हयगय करणाऱ्यांविरोधात आक्रमक कार्यवाहीसाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दोन नायब तहसीलदारांच्या निलंबनाचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. दर्यापूर तहसील कार्यालयातील या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे. 

राज्यमंत्री कडू अकोला जिल्ह्यातील अकोटकडे जात होते. याचवेळी त्यांनी रस्त्यात असलेल्या दर्यापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाला भेट दिली. त्या ठिकाणी एका शेतकऱ्याने अंत्योदय योजनेच्या लाभासाठी गेल्या एक वर्षापासून खेटे घालावे लागत असल्याची माहिती राज्यमंत्री कडू यांना दिली. दस्तऐवजांची पूर्तता केल्यानंतरही अधिकाऱ्यांकडून नाहक त्रास दिला जात असल्याचे या शेतकऱ्याने कडू यांना सांगितले. 

त्यासोबतच त्या ठिकाणी उपस्थित इतरांनीदेखील महसूल कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या तक्रारींचा पाढाच वाचला. राज्यमंत्री कडू यांनी यातील काही प्रकरणांची शहनिशा करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता दस्तऐवजांची पडताळणी करण्यात आली. तहसील सभागृहात त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. रेशन कार्डापासून वंचित नागरिकांच्या मुद्यावर श्री. कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. 

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभापासून अनेक वृद्ध वंचित राहत असल्याचेही त्यांना कळाले. या प्रकारामुळे संतापलेल्या कडू यांनी तत्काळ संजय गांधी निराधार योजनेच्या निरीक्षक सपना भोवते व पुरवठा विभागातील निरीक्षक प्रमोद काळे यांच्या निलंबनाचे आदेश दिले. तहसीलदार योगेश देशमुख यांना या दोघांच्या निलंबन आदेशावर कारवाई करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली. 

प्रशासनाकडून प्रस्ताव वरिष्ठांकडे  तहसीलदार योगेश देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यमंत्री कडू यांनी दोघांच्या निलंबनाचे आदेश दिले. परंतू त्यांच्याकडे कारवाईचे अधिकार नसल्याने हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : संवेदनशील कांदा, असंवेदनशील राज्यकर्ते

Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूर ७१ तर हातकणंगलेमध्ये ६८ टक्के चुरशीने मतदान

Cotton Farming : कापसाची करुण कहाणी

Onion Rate : कांदा पुन्हा गडगडला

Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांचा कौल मतपेटीत बंद

SCROLL FOR NEXT