मंत्री अर्जुन खोतकर 
मुख्य बातम्या

केंद्र सरकारने महाराष्ट्राला दर्जेदार परदेशी मत्स्यबीज द्यावे : मंत्री अर्जुन खोतकर

टीम अॅग्रोवन

मुंबई  : राज्यातील मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने ब्राझीलसह अन्य देशांतील दर्जेदार परदेशी मत्स्यबीज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली.

राज्यमंत्री खोतकर यांनी नुकतीच कृषी भवन येथे केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय मंत्री गिरिराजसिंह यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या बैठकीत त्यांनी मत्स्य व पशुधनविषयक बाबींवर चर्चा केली व काही मागण्याही केल्या. महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला असून, समुद्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. मासेमारी उद्योगातून राज्याला मोठा महसूलही मिळतो. उत्तमोत्तम मत्स्यबीज उपलब्ध झाल्यास मत्स्य उत्पादनात वाढ होऊन महसुलातही वाढ होणार आहे. त्यासाठी राज्याला ब्राझीलप्रमाणे अन्य देशांतील उत्तम मत्स्यबीज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या बैठकीत खोतकर यांनी केली. यास सकारात्मकता दर्शवत ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन गिरिराजसिंह यांनी या वेळी दिले. 

  ‘मिरकरवाडा बंदराला प्रशासकीय मान्यता द्यावी’ रत्नागिरीतील मिरकरवाडा मासेमारी बंदराच्या दुसऱ्या टप्प्यातील पायाभूत सुविधांच्या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी या वेळी श्री. खोतकर यांनी केली. २०१६ मधील पावसाने नुकसान झाल्यामुळे मिरकरवाडा बंदराच्या कामाचे अंदाजपत्रक आता ९४.७९ कोटी रुपये झाले आहे. तसेच, कोकणातील आनंदवाडी आणि कारंजा मच्छीमार बंदराच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्राकडून आतापर्यंत १२ कोटी आणि नंतर २३ कोटींचा निधी प्राप्त झाला असून उर्वरित निधी मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली.

तसेच केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय गोकुल मिशन, जनावरांच्या पायाचे व तोंडाचे आजार नियंत्रण कार्यक्रमासंदर्भात राज्य शासनाने तयार केलेल्या कृती आराखड्यास मंजुरी मिळावी, प्राण्यांच्या आजारावर नियंत्रण करण्‍यासाठी आखण्यात आलेल्या राज्य शासनाच्या कार्यक्रमास आर्थिक मदत करावी आणि राष्ट्रीय पशुधन कार्यक्रमांतर्गत राज्याला निधी उपलब्ध करून द्यावा, आदी मागण्या राज्यमंत्री खोतकर यांनी या बैठकीत केल्या. यास सकारात्मकता दर्शवत या मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह यांनी या वेळी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT