दूध
दूध  
मुख्य बातम्या

दर कपातीने दूध उत्पादक मेटाकुटीस

टीम अॅग्रोवन

पुणे ः शासनाने गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर २५ रुपये इतका दर जाहीर केला. पण दूध संघांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही आणि तांत्रिक अडचणी, अशी कारणे सांगत उत्पादकांची १६ ते २२ रुपयांवरच बोळवण केली जात आहे. एकीकडे दुष्काळामुळे चारा, वाहतुकीचा वाढलेला खर्च आणि दूध उत्पादनात होत असलेली घट आणि दुसरीकडे दराची ही स्थिती, यामुळे दूध उत्पादकांची अवस्था अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीसारखी झाली आहे. सरकारने गाईच्या दुधासाठी २५ रुपये प्रतिलिटर दर जाहीर केला. परंतु अनुदान योजनेतील तांत्रिक अडचणी दूध संकलन केंद्रांना येत आहेत. अनुदानासाठी सर्व माहिती आॅनलाईन भरण्याची अट असल्याने त्याची माहिती ठेवणे, ती अपलोड करणे, यासारखी कामे करण्यात संघांकडून चालढकल होत आहे. परिणामी सहकारी संघ वा खासगी संघ अनुदानाचे पैसे शासनाकडून मिळवणे आणि खाली ते संकलन केंद्रापर्यंत पोचवणे, ही कामे वेळेत करू शकत नाही. त्याचा फटका उत्पादकांना बसत आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रतिदिन १२ लाख लिटरपर्यंतचे संकलन होते. परंतु या दुधाला २५ रुपया प्रमाणे दर न देता २० ते २२ रुपये दर मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप कोणत्याही दूध संघांनी दुधाच्या दरात कपात केलेली नाही. परंतु राज्यातील इतर दूध संघांचा अंदाज पाहून जिल्ह्यातही दूधदर कपातीची भीती व्यक्त होत आहे. मराठवाड्यात दुधाला १६ ते २६ रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. परभणी जिल्ह्यातही गेल्या काही महिन्यांपासून शासकीय दूध दरात प्रतिलिटरमागे दोन रुपयांची कपात करण्यात आली आहे. खानदेशात प्रति दिन गायीच्या दुधाचे सुमारे ६ लाख लिटरपर्यंतचे संकलन आहे. गायीच्या दुधाची खेडा खरेदी १८ ते २१ रुपये प्रतिलिटरने होत आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना कोट्यवधींचा फटका बसत आहे. 

खर्चही निघेना दुष्काळामुळे खर्चाचं गणित बोजड  होत चाललं आहे. चारा, पाणी, खाद्य सारं काही विकत घ्यावं लागत असताना दूध संघांकडून दिले जात असलेले दुधाचे दर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाला परवडेनासे झाले आहेत. त्यातच सतत थकणाऱ्या पैशांमुळे शेतकऱ्यांची परवड वाढते आहे. दूध दराची स्थिती

  • थकलेले अनुदान आणि तांत्रिक अडचणी  च्या कारणावरून दरात कपात
  • राज्यभरात दूध दर १६ ते २२ रुपयांपर्यंत
  • दुष्काळात दर घसरल्याने उत्पादक अडचणीत
  • पशुखाद्य, वाहतूक खर्च वाढल्याने गणित कोलमडले
  • खर्च अधीक आणि दर कमी झाल्याने शेतकरी हवालदिल
  • थकणाऱ्या पेमेंटमुळेही वाढल्या अडचणी
  • प्रतिक्रिया दहा दिवसाला दूध घालण्यातून मिळणारे पैसे व त्यासाठी लागणारा खर्च यात सहा महिन्यापासून पाचशे रुपयांचा घाटा येतोय. - नंदू तुरकने, दूध उत्पादक, लाखगंगा, जि. औरंगाबाद.

    खासगी खरेदीदार थेट गावात येऊन दूध खरेदी करतात. गायीच्या दुधाला अपेक्षित दर नाहीत. सध्या १८ रुपये दर आहे. उन्हाळ्यात १९ रुपये दर होता. म्हशीच्या दुधाचे दर बऱ्यापैकी टिकून आहेत. - पद्माकर पाटील, दूध उत्पादक, शिरपूर, जि. धुळे 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

    Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

    Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

    Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

    Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

    SCROLL FOR NEXT