Milk producers in crisis in Jalgaon district
Milk producers in crisis in Jalgaon district 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटात

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख लीटर दूध संकलन होत आहे. संकलन व्यवस्थित असले, तरी दुधासह उपपदार्थांचा खप कमी झाला आहे. त्यामुळे खरेदीदार शेतकऱ्यांच्या दुधाला कमी दर देत आहेत. दुधाचे दर लीटरमागे १० ते ११ रुपयांनी कमी झाले आहेत. दुसरीकडे खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याने शेतकरी संकटात आहेत. 

जिल्ह्यात सहकारी दूध संघातर्फे रोज सुमारे सव्वातीन ते तीन लाख २० हजार लीटर दुधाचे संकलन होत आहे. यात गायीच्या दुधाचे सुमारे सव्वादोन लाख लीटरपर्यंत संकलन आहे. उर्वरित दूध म्हशीचे आहे. 

लॉकडाऊनपूर्वी दूध संघातर्फे म्हशीच्या दुधाला फॅटनुसार कमाल ५० रुपये प्रतिलीटरपर्यंत दर मिळत होता. तर, गायीच्या दुधालाही ३० रुपयांपर्यंतचा दर मिळत होता. परंतु, लॉकडाऊन सुरू झाले. कोरोनाचे संकट वाढले. तशी दूध संघांसह खासगी खरेदीदारांनी दूध व उपपादार्थांच्या विक्रीत घट झाल्याची चर्चा सुरू केली. शासनाकडे आपली अडचण सांगितली. याच वेळी दुधाचे खरेदीदरही कमी होत गेले. दूध संघातर्फे आता म्हशीच्या दुधाला कमाल ४५ रुपये प्रतीलीटरचा दर मिळत आहे. तर, गायीच्या दुधाला २७ रुपये प्रतीलीटरचा दर मिळत आहे. 

खासगी डेअऱ्या गायीचे दूध २० ते २१ रुपये, तर म्हशीचे दूध ३८ ते ४० रुपये प्रतिलीटरने घेत आहेत. खासगी डेअऱ्यांनी खरेदी दर कमी केले आहेत. त्या सुमारे तीन लाख लीटरपर्यंत दूध संकलन करतात. दुधाला खरेदीदार कमी दर देत आहेत. परंतु, विक्री दर कमी केलेले नाहीत. तुपाचे दर वधारले आहेत. डेअऱ्या ५५ ते ६० रुपये लीटर म्हशीच्या, तर गायीच्या दुधासाठी ४० ते ४५ रुपये प्रतीलीटरचा दर ग्राहकांकडून वसूल करीत आहेत. 

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कायम आहे. चाऱ्याचे दर दादरच्या कडब्य़ासाठी चार हजार रुपये प्रतिशेकडापेक्षा होते. मका, बाजरीचा चाराही प्रतिशेकडा दोन हजार रुपयांपर्यंत मिळाला. पशुखाद्याचे (सरकीढेप) दर १२०० रुपये प्रतिगोणी (६५ किलोची गोणी) आहेत. अन्य पशुखाद्यही प्रतिगोणी ८०० ते एक हजार रुपये प्रतिगोणीपर्यंत आहेत. मजुराची टंचाई असून, मजुरी महाग झाली आहे. शेणखताची मागणी कमी आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT