दूध संकलन बंद केल्याने शेतकऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना दुधाने अंघोळ
दूध संकलन बंद केल्याने शेतकऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना दुधाने अंघोळ 
मुख्य बातम्या

दूध संकलन बंद केल्याने शेतकऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना दुधाने अंघोळ

टीम अॅग्रोवन

चिखली, जि. बुलडाणा : विदर्भातील भंडारा येथील दूध प्रक्रिया केंद्र बंद झाल्याच्या कारणावरून बुलडाणा जिल्ह्यात प्रमुख दूध संकलन केंद्र असलेल्या चिखली शहरात संकलन व शितकरण केंद्रावर मंगळवार (ता. २८) पासून दूध स्वीकारणे बंद करण्यात आले. परिणामी, संतप्त शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांनी दूध शीतकरण केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरून तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दुधाने अंघोळ घालून निषेध व्यक्‍त केला.  

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रयत क्रांती संघटनेसह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी दूध संकलन केंद्रावर धाव घेऊन तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. दूध शीतकरण केंद्रावर संकलित होऊन आजपर्यंत भंडारा येथील शासकीय दूध प्रक्रिया केंद्राकडे पाठविले जात असे. मात्र हे केंद्र काही कारणास्तव बंद झाल्याने आता स्थानिक शितकरण केंद्रावरील दूध हे कोल्हापूर येथील दूध प्रक्रिया उद्योगाकडे पाठविण्यात येत आहे. कोल्हापूर येथे पोचण्यासाठी लागणारा वेळ आणि इतर कारणांमुळे दूध योग्य दर्जाचे नसल्याच्या कारणावरून चिखली केंद्रावरील संकलन थांबवण्यात आले आहे.

बाजार समितीचे माजी सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, रयतचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक, राष्ट्रवादीचे शंतनू पाटील यांनी दुग्ध व्यवसाय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सहकारी दूध डेअरीने दूध गोळा केल्यानंतर दूध शीतकरण केंद्रावर लगेच निर्धारित वेळेत आणून द्यावे, तरच ते दूध स्वीकारण्यात येईल, असा तोडगा काढण्यात आला. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांचे दूध स्वीकारण्यात आले. मात्र यापूर्वी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दूध घरी परत नेण्याऐवजी शीतकरण केंद्रावरील अधिकाऱ्यांना त्याने अंघोळ घातली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT