खानदेशात पपईच्या दरांबाबत व्यापाऱ्यांची मनमानी
खानदेशात पपईच्या दरांबाबत व्यापाऱ्यांची मनमानी 
मुख्य बातम्या

खानदेशात पपईच्या दरांबाबत व्यापाऱ्यांची मनमानी

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात पपईची आवक वाढताच व्यापाऱ्यांनी पिळवणूक सुरू केली आहे. तीन ठिकाणी तीन वेगवेगळे दर खरेदीदार देत आहेत. याकडे बाजार समित्यांचेही लक्ष नसल्याने दरांचा वाद वाढत आहे. एकच दर द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर व शिंदखेडा, नंदुरबारमधील तळोदा, शहादा आणि जळगावमधील चोपडा, यावल भागात पपईची लागवड बऱ्यापैकी आहे. यंदा पीक जोमात आहे. निकोप, दर्जेदार फळे येत आहेत. सध्या हंगाम जोमात आहे. आवक काहीशी वाढली आहे. शहादा भागात दिल्ली व राजस्थानचे व्यापारी खरेदी करीत आहेत. शिरपूर, चोपडा, यावल भागात मध्य प्रदेश व स्थानिक व्यापारी खरेदी करीत आहेत.

ऑक्‍टोबरच्या मध्यात १६ रुपये प्रतिकिलोचे दर मिळाले. आवक वाढल्यानंतर ्यापाऱ्यांनी दर कमी देण्यास सुरवात केली. मागील हंगामातही पपईच्या कमी दरांवरून वाद झाले. बाजार समित्यांनी मध्यस्थी केली नव्हती. अखेरिस शेतकरी संघटना, शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांवर दबाव आणून एक दर निश्‍चित केला. महिनानिहाय एक दर निश्‍चित करावेत. दुय्यम दर्जाच्या पपईसाठी स्वतंत्र दर असावेत, अशी मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT