बाजार समित्यांचा उद्या ‘देशव्यापी बंद’ Market committees to be closed nationwide tomorrow
बाजार समित्यांचा उद्या ‘देशव्यापी बंद’ Market committees to be closed nationwide tomorrow 
मुख्य बातम्या

बाजार समित्यांचा उद्या ‘देशव्यापी बंद’

टीम अॅग्रोवन

नागपूर : केंद्र सरकारने डाळवर्गीय शेतीमालाला साठवणूक मर्यादा (स्टॉक लिमिट) घालून दिली आहे. याचा विरोध म्हणून देशभरातील बाजार समित्या आणि डाळ मिल शुक्रवारी (ता. १६) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय व्यापार मंडळाने या संदर्भातील घोषणा केली आहे. या लाक्षणिक बंदनंतर स्टॉक लिमिटबाबत पुढील भूमिका घेतली जाणार असल्याचे भारतीय व्यापार मंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

केंद्र सरकारने डाळीचे दर कमी व्हावे याकरिता घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांकरीता स्टॉक लिमिट निश्‍चित केले आहे. याचा देशभरातील व्यापाऱ्यांना फटका बसत असल्याने त्यांनी आपल्यास्तरावर याचा विरोध केला. मात्र त्यानंतरही केंद्र सरकार हा निर्णय मागे घेण्यास तयार नसल्याने व्यापारी हतबल झाले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारला इशारा म्हणून शुक्रवारी (ता. १६) देशभरात बाजार समिती व डाळ मिल उद्योग बंद ठेवण्यात येणार आहेत. व्यापाऱ्यांचे देशव्यापी संघटन असलेल्या भारतीय व्यापार मंडळाने याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र, केरळ, आंध प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा या राज्यातील बाजार समित्यांनी या निर्णयाला समर्थन दिले आहे. त्यामुळे हा बंद यशस्वी होईल, असे सांगितले जात आहे. भारतीय व्यापार मंडळाच्या ऑनलाइन बैठकीत या संदर्भाने निर्णय घेण्यात आला. त्यानंतर एकदिवसीय लाक्षणिक बंदची हाक देण्यात आली. केंद्र सरकारने त्यानंतरही आपल्या निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास या विरोधात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया केंद्र सरकारने व्यापाऱ्यांची कोणतीही बाजू ऐकून न घेताच एकतर्फी साठवणूक मर्यादेचा निर्णय लादला आहे. त्यानंतर लगेचच देशभरातील व्यापारी बंद पाळणार होते, परंतु व्यापक शेतकरीहित लक्षात घेता तो मागे घेण्यात आला. मात्र केंद्र सरकार या निर्णयाबाबत पुनर्विचार करीत नसल्याने शुक्रवारी देशभरातील बाजार समित्या बंद ठेवण्यात येणार आहेत. देशभरातील तब्बल वीस हजारांवर बाजार समित्या या दिवशी बंद राहतील.  - बाबूलाल गुप्ता, अध्यक्ष, भारतीय व्यापार मंडळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

Storm Hits Meghalaya's : मेघालयात १३ गावांमध्ये घरांचे नुकसान, ४०० हून अधिक लोक बाधित

SCROLL FOR NEXT