Market committee elections after April: Co-operation Minister Patil 
मुख्य बातम्या

बाजार समित्यांच्या निवडणुका एप्रिलनंतर ः सहकारमंत्री पाटील

कऱ्हाड ः ‘‘गावोगावच्या विकास सेवा सोसायट्यांच्या निवडणुका एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत पार पडतील. त्यानंतर राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याची कार्यवाही केली जाईल. त्यादृष्टीने सहकार विभागाची कार्यवाही सुरू आहे,’’ अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शनिवारी (ता.१९) दिली.

टीम अॅग्रोवन

कऱ्हाड ः ‘‘गावोगावच्या विकास सेवा सोसायट्यांच्या निवडणुका एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत पार पडतील. त्यानंतर राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याची कार्यवाही केली जाईल. त्यादृष्टीने सहकार विभागाची कार्यवाही सुरू आहे,’’ अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शनिवारी (ता.१९) दिली. 

पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंकांच्या निवडणुका झाल्यानंतर गावोगावच्या सहकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुका या चुरशीने होत आहेत. त्यामुळे सोसायट्यांच्या निवडणुका झाल्यानंतर बाजार समितींच्या निवडणुका घ्याव्यात, असा सूर होता. विकास सेवा सोसायट्यांच्या निवडणुकांनंतर बाजार समित्यांच्या निवडणुका घेणार आहोत.’’ 

विरोधी पक्षनेते दरेकर यांच्यावरील कारवाईबाबत पाटील म्हणाले, ‘‘विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याबद्दल ‘आप’च्या शिंदे यांनी सहकार व गृह विभागाकडे तक्रार केली. दरेकर हे विधान परिषदेला उभे राहताना व्यवसाय म्हणून स्वतःची नोंद केली होती. मजूर म्हणून नोंद केलेली नव्हती. हा गुन्हा आहे, असे लक्षात आल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.’’ 

पाटील म्हणाले, ‘‘उसाच्या गाळपाचे नियोजन करण्याचे काम साखर आयुक्तांकडून सुरू आहे. कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊस संपल्याशिवाय गाळप बंद करू नये, असे कळवले आहे. गेल्या पाच वर्षांत फडणवीस सरकार सत्तेत असताना कोणत्याही ग्राहकाला वीजबिलाची मागणी केली नाही. लोकांत नाराजी आहे. शेती पंपाच्या वीजबिल अनुदान फरकाच्या रकमेबाबत अर्थ आणि ऊर्जा विभाग निर्णय घेईल.’’ 

‘५० हजार रुपये यंदाच देणार’ 

‘‘महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर महात्मा जोतीबा फुले कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले आहे, त्यांना ५० हजार रुपये देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली. यंदाच्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली आहे. या आर्थिक वर्षात ते अनुदान आम्ही देणार आहोत’’, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

आता २०२४ ची डेडलाइन 

पाटील म्हणाले, ‘‘निव्वळ सत्तेच्या मागे लागल्यामुळे काही आरोप होताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘२०२४ पर्यंत आम्ही थांबत आहोत’, असे सांगितले आहे. २०२४ च्या निवडणुकीला आम्ही दमदारपणे सामोरे जाऊ.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: उसाचे पेमेंट न मिळाल्याने शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Yedeshwari Yatra: येडेश्वरी यात्रा ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

Water Levels Drop: नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट

SMS Electricity Services: एसएमएस सेवेसाठी तेरा लाख ग्राहकांची महावितरणकडे नोंदणी

Crop Loan Distribution: परभणी जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण

SCROLL FOR NEXT