पुणे ः दिव्या सारथी प्रतिष्ठान आणि साकव यूथ फोरमच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या यूथ कनेक्ट अभियानाचे उद्‌घाटन रोहित पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी श्रीपाल सबनीस, दीपक मानकर, अंगद माने, विजय भोसले आणि अक्षय काटे.
पुणे ः दिव्या सारथी प्रतिष्ठान आणि साकव यूथ फोरमच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या यूथ कनेक्ट अभियानाचे उद्‌घाटन रोहित पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी श्रीपाल सबनीस, दीपक मानकर, अंगद माने, विजय भोसले आणि अक्षय काटे. 
मुख्य बातम्या

प्रक्रिया उद्योगात अनेक संधी : रोहित पवार

टीम अॅग्रोवन

पुणे : अनेक युवा उद्योजक शेतकऱ्यांकडून माल विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करतात. त्यातून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. यालाच शेतीचे ‘फॉरवर्ड इंटिग्रेशन’ म्हटले जाते. यापुढील काळात कृषी प्रक्रिया उद्योगात अनेक संधी आहेत, असे प्रतिपादन बारामती ॲग्रोचे अध्यक्ष तथा इंडियन शुगर्स मिल्स असोसिएशनचे उपाध्यक्ष रोहित पवार यांनी येथे केले.

दिव्य सारथी प्रतिष्ठान आणि साकव यूथ फोरम यांच्या वतीने नुकताच (ता.४) मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स सभागृहात आयोजित 'चावडी महाराष्ट्रा'ची या कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस होते. या वेळी माजी उपमहापौर दीपक मानकर, ॲड. रवींद्र रणसिंग, आनंद जाधव यांची उपस्थित होते. पवार म्हणाले, की आज शहरातील मॉलमध्ये शेतमालावर प्रक्रिया सहज उपलब्ध होतात. उसापासून अनेक फळांचे रस येथे मिळतात, याकरिता अधिक किंमत मोजण्यासाठी ग्राहक तयार असतात. शेतीमध्ये तुम्ही प्रक्रिया उद्योग म्हणजेच ‘फॉरवर्ड इंटिग्रेशन’ केले, तर नक्कीच उद्योजक बनू शकता. मात्र उद्योग करण्याचा केवळ विचार न करता त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे. याप्रसंगी प्रतिष्ठान आणि फोरमच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय ‘यूथ कनेक्ट अभियानास श्री. पवार यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या वेळी प्रतिष्ठानचा वीर खाशाबा जाधव पुरस्कार महाराष्ट्र केसरी अभिजित कटके यास आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार शांताराम कुंजीर यांना देण्यात आला. मान्यवरांची याप्रसंगी भाषणे झाली. अंगद माने यांनी प्रस्ताविक केले. कार्यक्रमास अक्षय काटे, पूजा झोळे, सागर पवार, रुपेश टेकाळे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन रवींद्र देशमुख यांनी तर आभार राजेश्वर देशमुख यांनी मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT