मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचले
मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचले 
मुख्य बातम्या

मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचले

टीम अॅग्रोवन

नाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी पोचविण्यासाठी छगन भुजबळ यांनी प्रयत्न केले होते. पुणेगाव धरण आणि केद्राई धरणातून एकाचवेळी पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, दरसवाडी धरण भरले जात आहे. मांजरपाडा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, पुणेगाव धरणाद्वारे पाणी पुणेगाव दरसवाडी, डोंगरगाव पोच कालव्यातून दरसवाडी धरणात पोचले आहे.  येवला तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने अद्यापही पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी मांजरपाडा प्रकल्पाचे जलपूजन झाल्यानंतर भुजबळ यांच्याकडून पुणेगाव डोंगरावर कालव्यातून विसर्ग होत असलेल्या पाण्याबाबत आढावा घेण्यात येत आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत कालव्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या असून युद्धपातळीवर कालव्याच्या सफाईचे काम सुरू आहे. दरम्यान, दरसवाडी धरण परिसरात पाऊस झाला नसल्याने धरण कोरडे आहे. धरण भरण्यास उशीर होत आहे. यासाठी छगन भुजबळ यांच्याकडून आढावा घेण्यात येत असून त्यांनी गेल्या आठ दिवसांत कालव्याची दोनदा पाहणी केली. या वेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, गणपत कांदळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, दिलीप खैरे, अरुण थोरात यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT