देशात आंब्याचे उत्पादन ४.२४ टक्क्यांनी वाढणार 
मुख्य बातम्या

देशात आंब्याचे उत्पादन ४.२४ टक्क्यांनी वाढणार

देशात चालू हंगामात आंब्याचे उत्पादन ४.२४ टक्क्यांनी वाढून २११ लाख टन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कृषी मंत्रालयाने २०२०-२१ मधील फळे आणि भाज्यांच्या उत्पादनाची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे.

वृत्तसेवा

नवी दिल्ली ः देशात चालू हंगामात आंब्याचे उत्पादन ४.२४ टक्क्यांनी वाढून २११ लाख टन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कृषी मंत्रालयाने २०२०-२१ मधील फळे आणि भाज्यांच्या उत्पादनाची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. फळांचा राजा समजल्या जाणाऱ्या आंब्याचे २०१९-२० या पीक वर्षातील उत्पादन २०२ लाख टन एवढे होते.  दक्षिण आणि पश्‍चिम भारतातून आंब्याची आवक सुरू झाली आहे. तर उत्तर प्रदेशसारख्या उत्तरेकडील राज्यांमधील आंब्याचा हंगाम जूनच्या मध्यापासून सुरू होणार आहे.  या वर्षी खरबुजाचे उत्पादन १३ लाख टन होण्याचा अंदाज असून, मागील वर्षी १३ लाख ६० हजार टन एवढे झाले होते. तर मागील वर्षी झालेल्या ३१ लाख ५ हजार टनांच्या तुलनेत यंदा कलिंगडाचे उत्पादन ३१ लाख २ हजार टन होण्याचा अंदाज आहे.  गेल्या वर्षी झालेल्या ३२६ लाख टनांच्या तुलनेत २०२०-२१ वर्षात केळीचे ३३८ हजार टन इतके उच्चांकी उत्पादन झाले आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मागील वर्षी झालेल्या १० कोटी २० लाख टनांच्या तुलनेत या वर्षी देशात १० कोटी ३२ लाख टन फळांचे उत्पादन झाले आहे.   प्रमुख भाज्यांपैकी स्वयंपाक घरातील बटाटा आणि कांद्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. यंदा टोमॅटोचे उत्पादन कमी असून, मागील वर्षी झालेल्या २११ लाख ७ हजार टनांच्या तुलनेत २०१ लाख ४ हजार टन उत्पादन झाले आहे. कांद्याचे उत्पादन वाढून गेल्या वर्षीच्या २६१ लाख टनांच्या तुलनेत २६३ लाख टन होण्याचा अंदाज आहे. तर बटाट्याच्या उत्पादनात वाढ झाली असून, ५३१ लाख टन झाले आहे. मागील वर्षी बटाट्याचे ४८५ लाख टन उत्पादन झाले आहे. देशातील एकूण भाजीपाल्याचे उत्पादन या वर्षी १९ कोटी ३६ लाख टनांनी वाढले असून, गेल्या वर्षी १८ कोटी ८९ लाख टन भाजीपाल्याचे उत्पादन झाले होते.  या वर्षी मधाचे उत्पादन एक लाख २० हजार टन राहण्याचा अंदाज आहे. तर मसाल्यांचे उत्पादन या वर्षी कमी राहणार असून, १०२ लाख टन होण्याचा अंदाज आहे. आकडेवारीनुसार, या चालू वर्षात फळ पिकांचे एकूण उत्पादन वाढून ३३ कोटी टन होण्याचा अंदाज आहे. या तुलनेत गेल्या वर्षी ३२ कोटी टन फळ पिकांचे उत्पादन झाले होते. यंदा कलिंगड, खरबुजाचे उत्पादन कमी कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या सन २०२०-२१ च्या फळ पिकांच्या उत्पादनाच्या अंदाजानुसार मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कलिंगड आणि खरबूज या उन्हाळ्यातील फळांचे उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Dispute: बांधावरच्या न्याय निवाड्यातून कोपरगावात ७५ वाद निकाली

US Iran conflict: इराणी ऊर्जाप्रकल्प बेचिराख करण्याचा अमेरिकेचा इशारा

Unseasonal Rain Issue: उजनी पाणलोट क्षेत्राला अवकाळीचा तडाखा

Banana Cluster Demand: केळी क्लस्टर, सोयाबीन प्रक्रिया केंद्र उभारा

MahaDBT Subsidy Delay: महाडीबीटी अनुदान रखडले

SCROLL FOR NEXT