संत्रा उत्पादकांना स्थानिक, आंतरराष्ट्रीय  बाजारपेठ उपलब्ध करून देणार ः शिंदे
संत्रा उत्पादकांना स्थानिक, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणार ः शिंदे 
मुख्य बातम्या

संत्रा उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार ः शिंदे

टीम अॅग्रोवन

नागपूर : दरवर्षी सुमारे ५० हजार हेक्‍टरने क्षेत्र वाढणाऱ्या संत्र्याची उत्पादकता जेमतेम आहे. त्या पार्श्‍वभूमीवर उत्पादनवाढीसाठी संत्रा उत्पादकांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचविण्यासोबतच स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी दिली.  सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने विदर्भातील सोयाबीन, तूर, मूग, उडदासोबतच मुख्य फळपीक असलेल्या संत्र्याची खरेदी केली जाणार आहे. यापूर्वी कंपनीच्या प्रतिनिधींकडून विदर्भात सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, वरिष्ठ व्यवस्थापक तुषार जगताप यांनी विदर्भातील नागपूर, अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागायतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. या वेळी दर्जेदार व रेसिड्यू फ्री संत्रा उत्पादनातील अडचणी जाणून घेतल्या. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्‍यातील दादासाहेब काळे, वरुड तालुक्‍यातील तिवसाघाट येथील उद्धव फुटाणे यांच्या संत्रा बागेची त्यांनी पाहणी केली. वरुड येथील सोनू व ताजू खान तसेच जैन व कोकाकोला उद्योगसमूहाच्या संत्रा प्रक्रिया उद्योगालाही त्यांनी भेट दिली. महाऑरेजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे, सुधीर जगताप दौऱ्यात त्यांच्यासमवेत होते. महाऑरेजचे श्रीधर ठाकरे यांच्या पुढाकाराने संत्र्याला बूस्ट देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे.  विलास शिंदे यांनी दोन दिवसांत या भागातील संत्रापट्ट्याचा अभ्यास केला. रोपवाटिकाधारकांशी देखील त्यांनी संवाद साधला. त्या वेळी वर्षभरात सुमारे एक कोटी संत्रारोपांची विक्री होत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. रोपविक्री आणि एकरी रोपांची संख्या पाहता लागवड क्षेत्र ५० हजार हेक्‍टरने वाढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काही व्यापाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यातून त्यांना सध्या १६०० कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती मिळाली. विपणन साखळी तयार करून ही उलाढाल पाच हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा आपला मानस असल्याचे विलास शिंदे यांनी सांगितले. संत्रा बागायतदारांसाठी विपणन साखळी तयार केली जाणार असल्याचे ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT