खानदेशातील प्रमुख प्रकल्प होताहेत कोरडे 
मुख्य बातम्या

खानदेशातील प्रमुख प्रकल्प होताहेत कोरडे

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशातील अनेक प्रमुख प्रकल्प कोरडे आहेत. त्यातील किरकोळ साठाही जवळपास संपत आला आहे. जळगाव जिल्ह्याच्या पश्‍चिम व दक्षिण भागातील सर्वच प्रमुख मध्यम प्रकल्प आटले आहेत. धुळे जिल्ह्यातही बुराई प्रकल्प कोरडा आहे. मालनगाव, करवंद प्रकल्पातील साठाही कमी आहे.

वाघूर व गिरणा धरणांमध्ये अनुक्रमे ४६ व ४७ टक्के जलसाठा होता. या प्रकल्पांमधून एकदा पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी आवर्तन सुटले आहे. आता दुसऱ्या आवर्तनाची प्रतीक्षा आहे. ते सुटल्यानंतर या प्रकल्पांमधील जलसाठा ३० टक्‍क्‍यांपर्यंतच राहील, अशी माहिती मिळाली. 

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, एरंडोल, चाळीसगाव, पारोळा भागातील सर्वच मध्यम प्रकल्प कोरडेठाक होण्याच्या स्थितीत आहेत. अग्नावती व हिवरा प्रकल्पात अनुक्रमे ६३ टक्के व २३ टक्के जलसाठा होता. तोही संपत आला आहे. अंजनी, बोरी, भोकरबारी, बहुळा व मन्याड, जामनेरमधील सर्व लघू तलाव कोरडे आहेत. तोंडापूर प्रकल्पातील पाच टक्के साठाही संपत आला आहे. यावल तालुक्‍यातील मोर प्रकल्पात ५५ टक्के साठा होता. तो ४० टक्‍क्‍यांवर आहे. चोपडा तालुक्‍यातील गूळ प्रकल्पही ५० टक्‍के आहे. तापी नदीवरील हतनूर प्रकल्पात १०० टक्के जलसाठा होता. तो झपाट्याने कमी होऊन ६० टक्‍क्‍यांपर्यंत आला आहे. 

धुळे जिल्ह्यातील पांझरा, करवंद व मालनगाव या प्रकल्पांमध्ये अनुक्रमे १००, ८४ व ९३ टक्के जलसाठा होता. तो आता ५० टक्‍क्‍यांपर्यंत आला आहे. तापी नदीवरील धुळे जिल्ह्यातील सुलवाडे बॅरेजमध्ये चांगला जलसाठा आहे, पण त्याचा उपयोग सिंचनासाठी होत नाही. कारण उपसा सिंचन योजना, पाट कार्यरत नाहीत. नंदुरबार जिल्ह्यातील दरा प्रकल्प कोरडा होत आला आहे. साक्री व नंदुरबारला लाभदायी ठरणाऱ्या बुराई प्रकल्पात साठा नाही. जिल्ह्यातील तापी नदीवरील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमध्ये जलसाठा आहे. परंतु त्यावरही उपसा सिंचन योजना कार्यरत न झाल्याने सिंचनासंबंधीची अडचण कायम आहे, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार कधी जमा होणार? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची माहिती

Incomplete Projects : अपूर्ण प्रकल्पांचा शेतकऱ्यांना मोठा फटका! रखडलेल्या योजनांमुळे बळीराजा संतापला

Farmer Loan Recovery: शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नका; एकनाथ शिंदेंचा फायनान्स कंपन्यांना इशारा

Solar Power Project: पडळ-माजगावमध्ये ५ मेगावॉटचा सौर प्रकल्प कार्यान्वित; अडीच हजार शेतकऱ्यांना दिलासा

Banana Cultivation Update: दीपोत्सवापूर्वी कांदेबाग केळी लागवडीची लगबग; खानदेशात ११ हजार हेक्टरवर लागवड पूर्ण

SCROLL FOR NEXT