नांदेड: माहूर मंडळात मुसळधार
नांदेड: माहूर मंडळात मुसळधार 
मुख्य बातम्या

नांदेड: माहूर मंडळात मुसळधार

सकाळ वृत्तसेवा

माहूर, जि. नांदेड : गेल्या अनेक दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे बुधवारी (ता.15) रात्री आठ वाजल्यापासून माहूर तालुक्यात जोरदार आगमन झाले आहे. माहूर मंडळांत 72 मिली मिटर एवढा पाऊस पडल्याने अतिवृष्टी झाली आहे. तर तालुक्यात 62 मि.मी.एवढा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. माहूर तालुक्यात गेल्या बारा तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे कुठे नुकसान झाले आहे का याची माहीती मिळू शकली नाही.

माहूर तालुक्यात चार मंडळ आहेत. माहूर मंडळात- 72 मि.मी, वाई- 61 मि.मी, वानोळा- 56 मि.मी, सिंदखेड- 59 मि.मी. एवढा पाऊस पडला आहे.तालुक्यात बारा तासात 62 मिली मिटर एवढा पाऊस पडला आहे तर चारही मंडळात एकुण-248 मिली मीटर एवढा पाऊस पडला आहे.तालुक्यात आज पर्यंत एकुण -696.25 मिली मिटर पाऊस पडला आहे.

बुधवारी रात्री सुरू झालेला मुसळधार पाऊस गुरुवारी (ता.16) सुरूच आहे. तेव्हा पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे, तर शेतातील पिकाचे नुकसानही होवू शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT