कृषी संशोधन आणि विस्तार संस्थांनी एकत्र कार्य करावे
कृषी संशोधन आणि विस्तार संस्थांनी एकत्र कार्य करावे 
मुख्य बातम्या

कृषी संशोधन आणि विस्तार संस्थांनी एकत्र कार्य करावे

टीम अॅग्रोवन

सगरोळी, जि. नांदेड : देशातील भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, तसेच इतर कृषी संलग्न यंत्रणा यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन कार्य केल्यास यापुढे कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल होऊन, तो देशातील मोठा उद्योग म्हणून पुढे येऊ शकतो, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे केले. सगरोळी (ता. बिलोली) येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्राचे कृषिवेद या प्रशासकीय इमारतीचे उद्‌घाटन सोमवारी (ता. १२) झाले. या वेळी अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, स्वगाताध्यक्ष आमदार सुभाष साबणे, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलिस महानिरीक्षक चिंरजीव प्रसाद, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू, संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख उपस्थित होते.  राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, की सतराव्या शतकातले गतवैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी कृषी व्यवसायात अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. पशुपालन, रेशीम शेती, हस्तकला, मधुमक्षिकापालन, अन्नप्रक्रिया या व्यवसायावर शेतकऱ्यांनी भर द्यावा. स्वयंसाह्यता गटाच्या माध्यमातून स्वयं उत्पादक बनून स्वतःचे ब्रँडिंग, पॅकेजिंग व मार्केटिंग करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी क्षेत्रासाठी भरीव काम करण्यास सुरवात केली असून उन्नत शेती, समृद्ध शेतकरी, जमीन आरोग्यपत्रिका, जलयुक्त शिवार अभियान या योजना कृषी क्षेत्रासाठी फलदायी आहेत.  श्री. बागडे म्हणाले, की निसर्गाचा लहरीपणा व अस्मानी, सुलतानी संकटांमुळे शेती पूर्णतः धोक्यात आली आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. कृषी विज्ञान केंद्रातर्फे प्रशिक्षण घेऊन नव्या कल्पना आत्मसात कराव्यात असे आवाहन केले. श्री. देशमुख यांनी संस्थेच्या पन्नास वर्षांच्या विश्वासावरच हे कृषी विज्ञान केंद्र उभारले असून, शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी हे केंद्र यशस्वीरीत्या कार्य करीत असल्याचे सांगितले. राज्यपालांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत कृषिवेद या इमारतीचे उद्‌घाटन झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT