वेण्णा तलाव परिसरातील स्ट्रॉबेरीच्या फळांवर व पानांवर हिमकणाचा वर्षाव झाला आहे.
वेण्णा तलाव परिसरातील स्ट्रॉबेरीच्या फळांवर व पानांवर हिमकणाचा वर्षाव झाला आहे. 
मुख्य बातम्या

महाबळेश्वरमध्ये हिमकणांची चादर

टीम अॅग्रोवन

महाबळेश्वर, जि. सातारा  ः राज्यात सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढू लागली असतानाच महाबळेश्वरमध्ये मात्र सध्या अल्हाददायक वातावरण अनुभवावयास येत आहे. येथील वेण्णालेक ते लिंगमाळा परिसरात शुक्रवारी (ता. २३) पहाटे दवबिंदू गोठून हिमकणांची पांढरी शुभ्र चादर शेतशिवारसह स्ट्रॉबेरी मळ्यामध्ये पाहावयास मिळाली. या परिसरात ४ ते ५ अंश डिग्री पारा खाली उतरला होता. महाबळेश्वर येथे गेल्या काही दिवसांपासून सकाळ व रात्रीचे वातावरण अत्यंत अाल्हाददायक होते. शुक्रवारी (ता. २३) सकाळी तर येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरात पहाटे प्रचंड थंडी होती. तेथील तापमान ४-५ अंश डिग्रीपर्यंत खाली उतरले होते. त्यामुळे सर्वत्र या परिसरातील स्ट्रॉबेरीचे मळे तसेच लिंगमाळा भागातील स्मृतिवनाच्या पठारावरील गवत, पाने, फुले, वेली यांच्यावर दवबिंदू गोठून हिमकणांची चादर पांघरल्याचे पहावयास मिळाले. हिवाळ्यात अशा प्रकारे हिमकण पहावयास मिळत असतात, मात्र उन्हाळी हंगामाच्या सुरवातीलाच अशा प्रकारे हिमकण दिसले आहेत. या वर्षी थंडीच्या मोसमामध्ये या नंदनवनात अनेक वेळा कडाक्‍याची थंडी पडली होती. मात्र त्या वेळेस जोरात वारेही होते, त्यामुळे हिमकण पहावयास मिळाले नाहीत. मात्र आज ऐन उन्हाळ्यात सुरवातीलाच अशा प्रकारे हिमकण दिसल्यामुळे समाधानाचे वातावरण आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार महाबळेश्वर शहराचे किमान तापमान सुमारे १०.० डिग्री सेल्सिअस होते, तर वेण्णा तलाव परिसरात ते ४ ते ५ अंश डिग्रीपेक्षा कमी असल्याचे जाणवत होते. दरम्यान ४ मार्च २०१५ रोजी व मागील वर्षी १३ मार्च २०१७ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र होळीचा सण साजरा होत असतानाच अशा प्रकाचे हिमकण महाबळेश्वरमध्ये पहावयास मिळाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT