मुख्य बातम्या

कर्जमाफीच्या चौथ्या यादीत पुणे जिल्ह्यातील २५ हजारांवर शेतकरी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतील पुणे जिल्ह्याची २५ हजार ६६२ पात्र शेतकऱ्यांची चौथी हिरवी यादी ‘पुणे जिल्हा सहकारी बॅंके’ला (पीडीसीसी) मिळाली आहे. चौथ्या यादीच्या कर्जमाफीची एकूण रक्कम ५७ कोटी ९७ लाख रुपये आहे. 

राज्य माहिती तंत्रज्ञान विभागाकडून (इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी - आयटी) ऑनलाइन अर्जांची छाननी करून संबंधित बॅंकांना याद्या पाठविण्यात येत आहेत. त्यानुसार मिळालेली यादी ‘पीडीसीसी’कडून तालुका शाखांकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आली आहे.
 
त्यामध्ये विकास सोसायटीचे नाव, शाखा, ‘आयएफएससी कोड नंबर’, ‘ब्रॅंच आयडी नंबर’, आधार क्रमांक आणि कर्जाची रक्कम याबाबत पुन्हा यादीनुसार तपासणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. संबंधित यादीतील पात्र लाभार्थ्यांची नावासह यादी क्षेत्रीय स्तरावरून जिल्हा बॅंकेकडे पुढील तीन-चार दिवसांत मिळण्याची शक्‍यता आहे. त्यातील अंतिम यादीतील नावानुसार तेवढ्या कर्जमाफीच्या रकमेच्या मागणी बॅंकेकडून शासनाकडे करण्यात येईल. ती रक्कम प्राप्त होताच संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येईल, असेही बॅंकेतील सूत्रांनी सांगितले.

कर्जमाफीतील अटींनुसार, पुणे जिल्ह्यातील ऑनलाइन अर्ज दाखल केलेल्या २ लाख २० हजार ३८६ पैकी आत्तापर्यंत ३८ हजार ३९४ शेतकऱ्यांच्या खात्यात २१२ कोटी ४२ लाख आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या ६३ हजार ४७२ शेतकऱ्यांच्या खात्यात ११० कोटी ४३ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. एकूण १ लाख १ हजार ८६६ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर ३२२ कोटी ८५ लाख रुपये जमा केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT