pune  
मुख्य बातम्या

हवामान विभागातील ग्रंथालय ठरतेय संशोधनाचे केंद्र 

बदलत्या हवामानाच्या काळात अचूक हवामानाचा अंदाज देण्यासाठी ग्रंथालयांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.

sandeep navale

पुणे ः बदलत्या हवामानाच्या काळात अचूक हवामानाचा अंदाज देण्यासाठी ग्रंथालयांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. पुणे हवामान विभागातील ९२ वर्षांच्या हवामानविषयक ग्रंथालयाचे यामध्ये महत्त्वाचे योगदान आहे. या ग्रंथालयामुळे राज्यातील नव्हे, तर देशपातळीवरील व जगातील हवामानाचे संदर्भ येथे मिळत आहेत. त्यामुळे संशोधनासाठी हे ग्रंथालय महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. 

पुणे हवामान केंद्र हे भारतातील सर्वांत जुने केंद्र आहे. हे केंद्र पूर्वी सिमला येथे होते. साधारणपणे १९२२ मध्ये ब्रिटिशांनी पुण्यात इमारत बांधल्यानंतर हे केंद्र सिमल्याहून पुण्याला स्थलांतरित केले. त्यानंतर येथून हवामान अंदाज देण्यास सुरुवात झाली. मात्र अंदाज देताना उपलब्ध होणारी माहिती संग्रहित करण्यासाठी ग्रंथालयाची गरज भासू लागली. त्यामुळे ब्रिटिशांनी येथे १९२८ मध्ये ग्रंथालय सुरू केले. सुरुवातीला छोट्या असणाऱ्या या ग्रंथालयाचा पसारा हळूहळू वाढत गेला. सध्या या ग्रंथालयामध्ये तब्बल १३ हजार ३५० पुस्तके आहेत. यामध्ये हवामानशास्त्र, वातावरणातील बदल, कॉम्प्युटर सायन्स, हवामान विषयातील सांख्यिकीविषयक पुस्तकांचा समावेश आहे. आजही या पुस्तकांचा, अहवालांचा वापर हवामान विभागातील शास्त्रज्ञ अभ्यासासाठी करत असल्याने या ग्रंथालयाला महत्त्व आहे. 

हवामानातील बदल, अचूक अंदाज, हवामानाची पार्श्‍वभूमी तपासण्यासाठी या ग्रंथालयाची मोलाची भूमिका राहिली आहे. हवामान केंद्र हे जवळपास एक ते दोन एकरांच्या कार्यक्षेत्रावर असले, तरी ग्रंथालयाचे एकूण क्षेत्रफळ ८० बाय १०० फूट आहे. दोन मजल्यांत उभारलेले आहे. हवामानाचे संदर्भ जोडण्यासाठी अनेक विद्यार्थी, शास्त्रज्ञ भेटी देतात. ग्रंथालय सकाळी दहा ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुले असते. संपूर्ण ग्रंथालय हे सागवानी लाकडापासून बनविलेले असून, उभ्या खांबावर कोरीव नक्षीदार काम केलेले आढळून येते. 

प्रकाशने ऑनलाइन उपलब्ध आहेत. जेणेकरून वाचकाला त्यांच्या गरजेची पुस्तके इंटरनेच्या माध्यमातून घरबसल्या शोधता येऊ शकतात. ही सर्व पुस्तके पुणे हवामान विभागाच्या www.imdpune.gov.in या संकेतस्थळावर १९ नोव्हेंबर २००८ पासून उपलब्ध आहेत. ग्रंथालयात प्रशस्त अशा स्वरूपात वाचनकक्ष आहे. यात २० जणांना बसता येईल, अशी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रंथालयात तीन अत्याधुनिक संगणक कक्ष असून, ते इंटरनेटला जोडलेले आहेत. ग्रंथालयात झेरॉक्सची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. 

ग्रंथालयातील नियतकालिकांमधून संदर्भ शोधण्यासाठी अत्याधुनिक सेवा सुरू केली आहे. ग्रंथालयात पुस्तकांचे वर्गीकरण ‘यूडीसी’ सुविधा वापरून विषयानुसार करण्यात आली आहे. ग्रंथालयाचा परिपूर्ण विकास साधण्यासाठी विद्यार्थ्यांच्या व शास्त्रज्ञांच्या सूचनांचे कायम आदरपूर्वक स्वागत केले जाते. यासाठी राष्ट्रीय हवामान केंद्रातील डॉ. पै व डॉ. ओ. पी. श्रीजीत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालयाचे आवश्यकतेनुसार वरिष्ठांशी चर्चा करून विकासात्मक निर्णय घेतले जातात.  डिजिटल ग्रंथालयावर भर  माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालय अद्ययावत होत असताना येथे डिजिटल ग्रंथालय विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून हवामानशास्त्र, वातावरणातील बदल, कॉम्प्युटर सायन्स, सांख्यिकीविषयक माहिती, भूकंप, दुष्काळ, वाऱ्याचा वेग, पाऊस अशा विषयांतील बहुसंख्य पुस्तके, अहवाल संग्रहित केले आहेत. हवामानविषयक काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे ग्रंथालय सतत मार्गदर्शक ठरत आहे.  ग्रंथालय वर्षातून दोन वेळा सर्वांसाठी खुले  शेतकरी, विद्यार्थी, शास्त्रज्ञांना हे ग्रंथालय पाहता यावे, तसेच त्याची माहिती व्हावी म्हणून हे ग्रंथालय २८ फेब्रुवारी रोजी विज्ञान दिन आणि २३ मार्च रोजी विश्‍व हवामान दिन या दोन्ही दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असते. या दिवशी पाऊस, तापमान, वाऱ्याचा वेग आदींची १०० वर्षांची माहिती पाहण्यासाठी उपलब्ध करून देतात.  ग्रंथालयाची ही आहेत वैशिष्ट्ये 

  • मद्रास येथील ईस्ट इंडिया कंपनीचे १८२२ मधील दस्तऐवज 
  • १८७६ मधील मेमोयर ऑफ आयएमडी नावाची पुस्तकशृंखला 
  • दैनंदिन हवामानाचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी लागणारे १८७८ पासूनचे अहवाल 
  • ग्रंथालयाची एकूण ग्रंथसंपदा  कृषी पुस्तके, संदर्भ ग्रंथ : १३३५०  नियतकालिके, मासिके : २५  वर्तमानपत्रे : ७  ई-नियतकालिके : १०  सीडी, डीव्हीडी : ५०० 

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Farmer Protest: सक्तीच्या वसुली विरोधात शेतात फडकवले काळे झेंडे

    Kalmana APMC: कळमना ‘एपीएमसी’ची ‘एसआयटी’ चौकशी अवैध

    Heavy Rain: परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अतिवृष्टीने पिके मातीमोल

    Gold Silver Rate: सोने-चांदी दरात वाढीचा कल

    Sugar Recovery Theft: इथेनॉलच्या नावाखाली उतारा चोरीचा संशय

    SCROLL FOR NEXT