संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यातील चार हरभरा खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ

टीम अॅग्रोवन

नगर  ः शेतकऱ्यांच्या शेतीमालाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी तूर, हरभरा खरेदी केंद्रे सुरू केली खरी, मात्र यंदा शेतकऱ्यांनी या केंद्रांकडे पाठ फिरवली आहे. हरभरा खरेदीसाठी सुरू करण्यात आलेल्या पाचपैकी चार खरेदी केंद्रांवर एकाही शेतकऱ्याने हरभऱ्याची विक्री केलेली नाही. पाच केंद्रांवर २०३९ क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. 

शेतकऱ्यांच्या शेतीमालाची हमीभावाने खरेदी व्हावी हा नियम आहे. मात्र, मालाला दर्जा नसल्याचे कारण पुढे करत बाजारात शेतीमालाची हमीभावाने खरेदी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शासन गेल्या दोन वर्षांपासून हमीभावाने तूर, हरभरा, मूग, उडीद, सोयाबीनची खरेदी करता, यावी यासाठी खरेदी केंद्रे सुरू करत आहे. जिल्ह्यामध्ये गेल्यावर्षी तुरीचे सर्वाधिक उत्पादन निघाले असल्याने तूर व हरभरा खरेदीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या वेळी शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करण्यासाठी कित्येक दिवस केंद्रावर ताटकळत बसावे लागले होते. शिवाय केंद्रचालक व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या मनमानी काराभाराचा फटका सोसावा लागला होता. विक्री केलेल्या मालाचे पैसे मिळण्यासाठीही अनेक महिने प्रतीक्षा करावी लागली होती. त्याबाबत विचारणा केली तर त्याची मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयातून माहिती दिली जात नसल्याने शेतकरी त्रासून गेले होते.

गेल्यावर्षीसारखी अवस्था होऊ नये म्हणून यंदा शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार तूर व हरभरा खरेदीसाठी श्रीगोंदा, राहूरी, शेवगाव, नगर, कर्जत या ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू केली खरी, मात्र शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी आणण्याचे टाळले आहे. गेल्या दोन वर्षांत तूर व हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली होती. त्या तुलनेत यंदा मात्र दोन टक्केही खरेदी झालेली नाही. यंदा ६५६ शेतकऱ्यांनी अवघी २०३९ क्विंटल तुरीची विक्री केली आहे. उत्पादकतेनुसार यंदा एका शेतकऱ्याला तुरीची हेक्‍टरी १ क्विंटल ८० किलो तर हरभऱ्याची २ क्विंटल चाळीस किलो एवढीच विक्री करता येत आहे. 

चार केंद्रांवर खरेदीच नाही  यंदा शेवगाव, राहुरी, नगर, कर्जत, श्रीगोंदा या पाच ठिकाणी हरभरा विक्रीसाठी आतापर्यंत अवघ्या १८६ शेतकऱ्यांनी ॲनलाइन नोंदणी केली आहे. त्यातील शेवगावला फक्त १०२ शेतकऱ्यांनीच ३२५ क्विंटल हरभरा विकला आहे. बाकी चार ठिकाणी एकही शेतकरी हरभरा विक्रीसाठी फिरकलेला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT