उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा फटका शक्‍य
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा फटका शक्‍य 
मुख्य बातम्या

उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा फटका शक्‍य

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती बऱ्यापैकी असून, यंदा पेरणी वाढल्याने उत्पादनही अधिक येईल, असे चित्र आहे. परंतु, उशिरा पेरणी केलेल्या गव्हाला थंडी हवी आहे. सध्या मात्र किमान तापमान २० अंश सेल्सिअसवर पोचले आहे. तर कमाल तापमानही ३१ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहत असून, वाढत्या तापमानाचा गहू पिकाच्या उत्पादनाला फटका बसण्याची शक्‍यता आहे.  गहू पिकाची पेरणी मागील हंगामात कमी किंवा कृषी विभागाच्या अपेक्षेपेक्षा कमी झाली होती. खानदेशात गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ४५ हजार हेक्‍टर आहे. परंतु मागील हंगामात दुष्काळी स्थितीमुळे गव्हाची पेरणी फक्त तापी, गिरणा, पांझरा, वाघूर नदीच्या क्षेत्रात झाली होती. ही पेरणी फक्त सुमारे २५ हजार हेक्‍टरपर्यंत पोचली होती. यंदा पाऊस बऱ्यापैकी झाला. सर्व प्रकल्पांमधील जलसाठाही मुबलक होता. तसेच ज्वारी, मक्‍यावर मागील हंगामात अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोप वाढल्याने पीक मोडण्याची वेळ आली होती. त्यात शेतकऱ्यांना अन्य पिकांकडे वळावे लागले होते. त्यात वेळ व पैसा वाया गेला होता. यामुळे या हंगामात शेतकऱ्यांनी गहू पिकाची पेरणी करण्याचे नियोजन दिवाळीनंतर केले होते. दिवाळीनंतर मका, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांखालील क्षेत्र रिकामे झाले. तसेच त्यापूर्वी मूग, उडदाखालील क्षेत्र रिकामे झाले होते. या क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांनी गहू पिकाची पेरणी सुरुवातीला केली. नोव्हेंबरच्या मध्यापासून पेरणी सुरू झाली. पेरणी जानेवारीतही झाली. कारण थंडी फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत कायम राहील, असे संकेत मिळत होते. परंतु मागील पाच - सहा दिवसांपासून किमान व कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. थंडी कमी झाली आहे. ५१ हजार हेक्‍टरवर गव्हाचा पेरा  जळगाव जिल्ह्यात सुमारे ३५ हजार हेक्‍टर क्षेत्र असल्याचा अंदाज आहे. यापाठोपाठ नंदुरबार व धुळ्यात गव्हाची पेरणी झाली आहे. मध्यंतरी काही भागात गव्हावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोप झाला होता. शेतकऱ्यांनी उपाययोजना करून अळीचा प्रकोप कमी केला. आता थंडी कमी झाल्याने दाणे पक्व होण्याची क्रिया मंद होईल. उत्पादन घटेल, असे शेतकऱ्यांचे  म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT