केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी; लासलगाव बाजार समितीच्या सभापतींची मागणी
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी; लासलगाव बाजार समितीच्या सभापतींची मागणी 
मुख्य बातम्या

केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी; लासलगाव बाजार समितीच्या सभापतींची मागणी

टीम अॅग्रोवन

नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण थांबविण्यासाठी केंद्राने कांदा निर्यातबंदी संदर्भात काढलेली अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी केंद्र शासनाकडे केली असल्याची माहिती लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. केंद्र शासनाने गेल्या २९ सप्टेंबरला कांदा निर्यातबंदी करून घाऊक व्यापाऱ्यांना ५०० क्विंटलपर्यंत व किरकोळ व्यापाऱ्यांना १०० क्विंटलपर्यंत कांदा साठवणुकीची मर्यादा घालून दिली आहे. यामुळे दिवसेंदिवस कांदा बाजारभावात घसरण होत आहे. निर्यातबंदीचा परिणाम बाजारभावावर झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने बाजार समितीने या संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, कृषी व ग्रामविकासमंत्री नरेंद्रसिंग तोमर, ग्राहक संरक्षण आणि अन्न वितरण मंत्री रामविलास पासवान, खासदार भारती पवार यांना निवेदन दिले आहे. निवेदनात नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सद्यस्थितीत विक्रीस येणारा उन्हाळ (रब्बी) कांदा हा येथील शेतकऱ्यांनी मार्च-एप्रिलमध्ये काढणी करून त्यांच्याकडील कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. शेतकरी त्यांच्या आर्थिक गरजेनुसार त्याची विक्री करीत आहे. केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी व कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्यामुळे तसेच दक्षिणेकडील राज्यांमध्ये नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने मागणीअभावी कांदा बाजारभावात सातत्याने घसरण सुरू आहे. त्यामुळे केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी संदर्भात काढलेली अधिसूचना रद्द करून कांदा साठवणुकीवरील मर्यादा वाढविण्याची मर्यादा काढून कांदानिर्यात बंदी उठवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT