For land survey in Pune district Construction of four 'Course Stations'
For land survey in Pune district Construction of four 'Course Stations' 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात जमीन मोजणीसाठी  चार ‘कॉर्स स्टेशन’ची उभारणी 

टीम अॅग्रोवन

पुणे : भूमी अभिलेख विभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर हवेली तालुक्यात मोजणी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यात चार ठिकाणी कंन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन (कॉर्स स्टेशन) उभारले आहेत. या कॉर्सच्या आधारे जीपीएस रीडिंग केवळ ३० सेकंदांत घेता येणार आहे. या सुविधेमुळे जमिनीची मोजणी अत्यंत कमी वेळात आणि अचूक होणार असून, या तंत्रज्ञानामुळे पाच एकर क्षेत्र मोजण्यासाठी केवळ अर्धा तास लागणार आहे.  राज्यात ७७ ठिकाणी कॉर्स (कंन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात चार ठिकाणे निवडली आहेत. यामध्ये शिरूर, मावळ, पुरंदर आणि दौंड या चार ठिकाणी कॉर्स स्टेशन उभारले आहेत. एक कॉर्स स्टेशन भोवतीच्या ३५ किलोमीटरच्या त्रिज्येच्या क्षेत्रात जीपीएस रीडिंग देणार आहे. कॉर्सचे रीडिंग रोव्हर रिसिव्ह करणार असून, हे रीडिंग टॅबमध्ये दिसेल. राज्यात अशा प्रकारे ४०० रोव्हर बसविले आहेत. 

...असे होते मोजमाप  सध्या जमीन मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडून ईटीएस मशिनचा वापर करण्यात येतो. जागेवर जीपीएस रीडिंग घेऊन त्या क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जाते. या अक्षांश व रेखांशाच्या आधारे जमीन मोजणी करणे सोयीचे ठरते. मात्र सध्याच्या अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानानुसार अचूक जीपीएस रीडिंग घेण्यासाठी किमान एक तास ते चार तास लागतात. जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा हा वेळ कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने कॉर्स, या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. कॉर्स आधारे जीपीएस रीडिंग केवळ ३० सेकंदांत घेता येते आहे. त्यामुळे मोजणीच्या कामासाठी एक दिवस ते चार दिवस लागत होते, ते काम आता अर्ध्या तासात होणार आहे. त्यामुळे दिवसभरात किमान तीन ते चार मोजणीची कामे पूर्ण करणे शक्य होईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT