सांगलीत कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी
सांगलीत कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी 
मुख्य बातम्या

सांगलीत कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी

टीम अॅग्रोवन

सांगली : सांगली शहरात कृष्णा नदीची पाणी पातळी धोक्याच्या इशाऱ्यावर गेली आहे. आयर्विन पुलाजवळ आज (ता.४) सकाळी नऊ वाजता पाणी पातळी ४१ फूट होती. रात्रभर शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातील उपनगरही पाण्यात गेले आहेत.

कृष्णा नदीची पाणीपातळी सातत्याने वाढत असल्यामुळे रात्रीपासून नदीकाठचा जवळच्या मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, दत्तनगर, साई कॉलनी, कर्नाल रोड या भागातील परिसर पुन्हा पाण्याखाली गेला आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून काल रात्री एक वाजता मौलाना नगर भागातील कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. तसेच मगरमच्छ कॉलनीतील काही कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यापूर्वीही चारशेहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. स्थलांतर करण्यात आलेल्या नागरिकांची सोय महापालिकेच्या शाळा क्रमांक १ आणि शाळा क्रमांक २५ येथे करण्यात आली आहे.

आज सकाळपासून शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोयना धरणातून काल पाणी सोडण्यात आले आहे हे पाणी आज संध्याकाळपर्यंत सांगलीत पोहोचणे शकत आहे त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होणार आहे तसेच वारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे कृष्णा नदीकाठावरील गावे आणि वस्त्यांना पुराचा धोका निर्माण झाला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT