नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे नव्या विद्युत प्रकल्पास मान्यता
नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे नव्या विद्युत प्रकल्पास मान्यता 
मुख्य बातम्या

नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे नव्या विद्युत प्रकल्पास मान्यता

टीम अॅग्रोवन

मुंबई : राज्यातील विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्रामध्ये १३२० मेगावॉट क्षमतेच्या कोळशावर आधारित सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित विद्युतनिर्मिती प्रकल्प उभारणीस राज्य मंत्रिमंडळ बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. वेगाने होणारे औद्योगीकरण तसेच पायाभूत सुविधांच्या विकासामुळे राज्यातील विजेच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच शेवटच्या घटकापर्यंत वीज पोचविण्याच्या शासनाच्या धोरणामुळे विजेच्या मागणीत वाढ होत आहे. याबरोबरच महानिर्मिती कंपनीची सध्याची एकूण स्थापित क्षमता १३ हजार ६२० मेगावॉट असून, त्यापैकी १० हजार १७० मेगावॉट क्षमता कोळशावर आधारित आहे. त्यातील १६८० मेगावॉट क्षमतेचे जुने संच बंद करावे लागणार आहेत. त्यामुळे नव्या प्रकल्पांची निर्मिती आवश्यक झाली आहे. त्यानुसार कोराडी येथे १३२० मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्रातील संच क्रमांक ६ च्या कार्यक्षम नूतनीकरण व आधुनिकीकरण प्रकल्पाच्या ५६३ कोटी १२ लाख रुपयांच्या सुधारित खर्चास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जागतिक बँकेच्या वित्तपुरवठा योजनेअंतर्गत केंद्र सरकारमार्फत कोळशावर आधारित वीज केंद्रांचा पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येतो. त्यानुसार कोराडी केंद्रातील संच क्रमांक सहाचे कार्यक्षम नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात येत आहे. सुधारित खर्चानुसार एकूण ७७ कोटी ५ लाख रुपयांपैकी ६० कोटी ४३ लाख रुपये महानिर्मिती कंपनीस स्वत:च्या अंतर्गत स्रोतातून वाट्याच्या स्वरूपात उपलब्ध करून घेण्यात येतील. तसेच शासनाच्या भागभांडवलापोटी १६ कोटी ६२ लाख एवढी रक्कम शासनाकडून महानिर्मिती कंपनीस देण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT