Kirtangali villagers give 37 quintal wheat to poor people
Kirtangali villagers give 37 quintal wheat to poor people 
मुख्य बातम्या

कीर्तांगळी ग्रामस्थांकडून गोरगरिबांना ३७ क्विंटल गहू 

टीम अॅग्रोवन

नाशिक : लॉकडाऊनमुळे सिन्नर तालुक्यातील अडचणीत असलेल्या गोरगरिबांना व हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या कुटुंबियांना ‘युवा मित्र’तर्फे सामाजिक बांधिलकीतून १५ ते २० दिवसांच्या किराण्याचे वाटप करण्याचे काम गेल्या २० दिवसांपासून सुरू आहे. यासाठी अनेक जण मदतीचा हात पुढे करत असून यात कीर्तांगळी येथील ‘संत हरीबाबा पाणी वाटप संस्था’ व गावकऱ्यांकडून तब्बल ३७ क्विंटल गहू जमा करत ‘युवा मित्र’ संस्थेकडे सुपूर्द केला. 

पाण्याचे योग्य नियोजन व्हावे यासाठी गावात ‘युवा मित्र’तर्फे पाणी वापर संस्थेची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे येथील गावकऱ्यांचा ‘युवा मित्र’वर मोठा विश्वास निर्माण झाला. याच अनुषंगाने संत हरीबाबा पाणी वापर संस्थेने पुढाकार ग्रामस्थांना ‘युवा मित्र’च्या उपक्रमासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले. 

यावर प्रत्येकाने आपल्या परीने शक्य तितके गहू यासाठी जमा केले. बघताबघता गावातून तब्बल ३७ क्विंटल धान्य जमा झाले. यानंतर हे धान्य गावकऱ्यांनी ट्रॅक्टरमध्ये जमा करुन ‘युवा मित्र’कडे सुपूर्द केले. तसेच धान्य दळल्यानंतर पिठासाठी गोण्यांची व्यवस्था करून दिली. यासाठी कीर्तांगळीचे ग्रामस्थ, संत हरीबाबा पाणी वापर संस्था व शेतकऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले. 

गावात दरवर्षीप्रमाणे अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन होणार होते. मात्र, लॉकडाऊन पुन्हा वाढल्यामुळे सप्ताह रद्द करण्यात आला. परंतु, दरवर्षी यासाठी जमा करण्यात येणारी मदत यावर्षी गरिबांच्या कामाला यावी यासाठी ‘युवा मित्र’च्या या उपक्रमासाठी धान्य देण्याचे ठरविले. ‘युवा मित्र’ने गेल्या २ वर्षात गावात केलेल्या जलसमृद्धीच्या कामामुळे गावकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी भर पडली. त्यामुळे ‘युवा मित्र’वर आमचा मोठा विश्वास आहे. प्रत्येकाने शक्य तितके धान्य जमा करून यात आपला सहभाग नोंदविला.  - दगू चव्हाणके, अध्यक्ष, संत हरीबाबा पाणी वापर संस्था 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

The Economist : इकॉनॉमिस्टच्या नजरेतून दक्षिण व उत्तर भारत

Urja Bio System : शाश्‍वत ऊर्जेसाठी ‘ऊर्जा बायो सिस्टिम प्रा. लि.’ची साथ

Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

Weekly Weather : कमाल, किमान तापमानात वाढ; उष्णतेच्या लाटेची शक्यता

Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

SCROLL FOR NEXT